Pankaja Munde News : पंकजाला माहेरी आणून महादेव जानकर भाजपला देणार धक्का?

Mahadev Jankar Warns BJP : जन सुराज्य यात्रेतून रासप देशभरात शक्तिप्रदर्शन करणार...
Pankaja Munde, Mahadev Jankar
Pankaja Munde, Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पक्ष नेतृत्वाकडून सतत डावलले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंडे यांच्यासह त्यांचे समर्थकही भाजपमध्ये नाराज आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनी वारंवार स्पष्टपणे सांगितले आहे. वाट पाहूनही संधी दिली जात नसल्याची तक्रार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचेही मुंडे म्हणाल्या होत्या.

यावरून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नाव न घेता भाजपला इशारा दिला आहे. पंकजाला त्रास होत असेल तर माहेरी आणणार, असा जानकरांनी पुनरुच्चार केला. यातून एनडीएत नाराज असलेले जानकर भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

Pankaja Munde, Mahadev Jankar
Wablewadi School Case : वाबळेवाडी शाळा प्रकरणातील दत्तात्रय वारे अखेर दोषमुक्त : पुणे जिल्हा परिषदेकडून आदेश जारी

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी जानकरांना मानस पुत्र मानले होते. २०१९ मध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना पक्षातून सापत्न वागवणूक मिळत असल्याची चर्चा वारंवार होत आहे. यावर भावा-बहिणीच्या नात्याची आठवण करून देत जानकरांनी पंकजा यांना आपल्यासोबत आणणार असल्याचा पुनरुच्चार केला. ते शिर्डी येथील जन स्वराज्य यात्रेत बोलत होते. यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी होऊ शकतात, असे बोलले जात आहे. (Maharashtra Political News)

जनसुराज्य यात्रेच्या माध्यमातून देशभर ताकद निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जानकरांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या आडून नाव न घेता भाजपवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'पंकजा मुंडे (Pankaja Munde) माझी बहीण आहे. त्या सध्या एका जबाबदार पक्षाचे काम करत आहेत. ज्यावेळी बहिणीला खूप त्रास होईल, त्यावेळी त्यांना माहेरच्या झोपडीत घेऊन येईल,' असे म्हणत जानकारांनी मुंडेच्या राजकीय भविष्याबाबतही सूचक वक्तव्य केले आहे.

राहता तालुक्यातील कोल्हार येथील भगवती मातेच्या मंदिरात दर्शनाने या यात्रा राज्यभर फिरणार आहे. या वेळी जानकर म्हणाले, 'जन स्वराज्य यात्रेनिमित्त दोन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध गावांतील नागरिकांशी संवाद साधणार आहे. सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षावर टीका करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रासाठी काय करू शकतो, शेतकरी आणि सामान्यांचे काय प्रश्न आहेत, हे जाणून घेण्यासाठी राज्यासह, देशभर ही यात्रा करणार आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून छेडले असता जानकरांनी दोन्ही समाजाची भूमिका योग्य असल्याचे म्हटले. जानकर म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे. धनगर समाजालाही एस.टी. प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. त्यानुसार समाजाचा रेटा तयार व्हायला हवा. त्यासाठी समाजातून आमदार, खासदारांची संख्या वाढली तर सरकार घाबरते, असे स्पष्ट मत जानकरांनी व्यक्त केले.

(Edited by Sunil Dhumal)

Pankaja Munde, Mahadev Jankar
Mahadev Jankar In Shirdi : लोकसभेसाठी महादेव जानकर 'अॅक्शनमोड'वर; शिर्डीतून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com