Sharad Pawar Markadwadi Tour : पवारांच्या दौऱ्यात होणार ‘लाँग मार्च’चे प्लॅनिंग; राहुल गांधींसह केजरीवाल, बॅनर्जी, अखिलेश, ठाकरेही येणार?

EVM Machine Voting Issue : ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मारकडवाडी गावकऱ्यांपैकी तब्बल 89 जणांवर जिल्हा प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
Sharad Pawar Markadwadi Tour
Sharad Pawar Markadwadi Tour Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 December : अवघ्या चार हजार लोकवस्तीचे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ‘ईव्हीएम’च्या विरोधात रान उठविल्याने संपूर्ण देशाच्या नकाशावर झळकत आहे. ‘ईव्हीएम हटाव; बॅलेट पेपर लाव’ या मोहिमेचा श्रीगणेशा मारकडवाडीतून होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या (ता. 08 डिसेंबर) मारकडवाडीत येणार आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढण्याचे निश्चित झाले असून तयासाठी उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदींना आमंत्रित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडीतून (Marakadwadi) भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले, त्यामुळे ईव्हीएमवर संशय घेऊन ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, प्रशासनाने परवानगी नाकारली. गावात जमावबंदीचा आदेश लागू केला. तसेच, मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांपैकी तब्बल 89 जणांवर प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.

‘ईव्हीएम’च्या विरोधात आवाज उठविणारे मारकडवाडी आज देशात गाजत आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, यासाठी ठोस भूमिका घेणाऱ्या मारकडवाडी ग्रामस्थांच्या भेटीसाठी उद्या (रविवारी, ता. 08 डिसेंबर) शरद पवार (sharad Pawar) येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी मारकडवाडी ग्रामस्थांनी केली आहे. गावालगतच्या गायरानावर हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात येत आहे.

Sharad Pawar Markadwadi Tour
Markadwadi Voting : मारकडवाडीच्या ठिगणीचा देशभरात वणवा पेटणार, दिल्लीत अभ्यास सुरू; पटोलेंनी सांगितली अंदर की बात

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नूतन आमदार उत्तम जानकर हेही असणार आहेत. पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी उत्तम जानकर यांचे जीवन जानकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माळशिरस बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, डॉ. आप्पासाहेब वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेलिपॅड ते ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मंचापर्यंत येणाऱ्या मार्गावरील स्वच्छता, रस्त्यालगतची झाडी काढून स्वच्छतेचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक पवार, सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे, भाऊसाहेब गोसावी यांनी हेलिपॅड, पार्किंगची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.

Sharad Pawar Markadwadi Tour
Assembly Session : विधीमंडळ आवारात झळकले ‘आय लव मारकडवाडी’चे फलक; विरोधकांचा ‘ईव्हीएम’वर पुन्हा हल्लाबोल

दरम्यान, ईव्हीएम मशीनविरोधात रान उठवलेले मारकडवाडीतून आता देशभरात वणवा पेटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या या दौऱ्यात ईव्हीएम विरोधातील लॉंग मार्च काढण्याची तारीख निश्चित होणार आहे. या लाँग मार्चला राहुल गांधी यांच्यासोबतच उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदींना निमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com