Devendra Fadnavis Oath Ceremony : निमंत्रण देऊनही फडणवीसांच्या शपथविधीला शरद पवार अनुपस्थित का? मोठं कारण आलं समोर

Devendra Fadnavis Oath Ceremony Sharad Pawar Nana Patole: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र ते देखील शपथविधी समारंभाला उपस्थित राहिले नाहीत.
uddhav thackeray Sharad Pawar
uddhav thackeray Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Oath Ceremony : महायुतीच्या ग्रँड विजयानंतर आज (गुरुवारी) देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्रि अमित शाह यांच्यासह भाजप सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणासाठी शरद पवार यांना देखील फोन केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दिल्लीत सुरू असलेल्या अधिवेशनामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत, अशी माहिती आहे.

uddhav thackeray Sharad Pawar
Ajit Pawar Video : 'मी अजित आशाताई अनंतराव पवार...', उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच अजितदादांनी घडवला इतिहास!

महाविकास आघाडीच्या देखील सर्वच नेते शपथविधी समारंभाला उपस्थित नव्हते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र ते देखील शपथविधी समारंभाला उपस्थित राहिले नाहीत. नागपूरला असल्याने ते शपथविधीला उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती आहे.

ठाकरे कुटुंबीय अनुपस्थित

शपथविधी समारंभासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच राज ठाकरे यांना देखील शपथविधीचे आमंत्रण होते. मात्र, ठाकरे कुटुंबातील कोणीही शपथविधीसाठी उपस्थिती राहिले नाही. राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

शपथविधीला दिग्गजांची हजेरी

देवेंद्र फडणवीस यांच्या शपविधी समारंभासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू तसेच सचिन तेंडुलकर, अंजली तेंडूलकर, रणबीर कपूर, रणवीर सिंग, शाहरूख खान हे उपस्थित होते.

uddhav thackeray Sharad Pawar
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच फडणवीस हे वसंतराव नाईक, शरद पवारांच्या पंक्तीत जाऊन बसले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com