Dattatray Bharane: मंगळवेढ्याच्या राष्ट्रवादीला भरणेंनी दिले तीन पर्याय! नगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरु

Dattatray Bharane: नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी महायुतीतील मित्र पक्षांकडून निवडणूक लढवण्यासंदर्भात चाचपणी सुरू झाली आहे.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

Dattatray Bharane: नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी महायुतीतील मित्र पक्षांकडून निवडणूक लढवण्यासंदर्भात चाचपणी सुरू झाली आहे. त्यातच आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भेटीदरम्यान तीन पर्याय दिले आहेत. त्यामुळं येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीचा गट कोणता पर्याय निवडून निवडणुकीला सामोरे जातो याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Dattatray Bharane
दिवाळीत 6 लाख कोटींची रेकॉर्ड ब्रेक विक्री; कुठल्या क्षेत्राचा वाटा किती?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक टेंभुर्णी इथं घेण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, मतदारसंघध्यक्ष अजित जगताप, अरुण किल्लेदार, तालुकाध्यक्ष भारत बेदरे, बबन ताड, नजीर इनामदार, प्रवीण खवतोडे, भारत नागणे, संजय कट्टे, शंकर माळी, ज्ञानेश्वर भगरे, रविराज मोहिते, आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dattatray Bharane
पुणेकरांनो फटाके जपून उडवा! आग लागल्यास 'या' क्रमांकावर करा फोन

राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष कुणाला करायचा यासाठी सध्या चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने बैठक घेऊन काही करा पण नगराध्यक्ष शिवसेनेचा करा अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्यामुळं शिवसेनेचा गट कामाला लागला आहे. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक लोकप्रतिनिधी भाजपचा असल्यामुळं भाजपचा नगराध्यक्ष झाला पाहिजे या दृष्टीकोनातून भाजपचे नेते देखील कामाला लागले आहेत.

Dattatray Bharane
Navneet Rana: मजबुरी का नाम ठाकरे! नवनीत राणांनी उद्धव-राज यांना डिवचलं

मग या दोघांच्या बरोबरीत राष्ट्रवादी कशी मागे राहील? राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळं नगराध्यक्ष व जागा वाटपामध्ये युती झाली तर सर्वांसोबत युती करून लढावे, अशा सूचना दिल्या. स्वबळावर लढायचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला तर स्वबळावर लढण्यासाठी नगराध्यक्ष व 21 जागांची तयारी ठेवा, असंही त्यांनी सांगितलं. जर स्थानिक पातळीवर आघाडी करून लढायचं असेल तर त्या संदर्भातील वरिष्ठांची परवानगी घेऊन लढण्याच्या सूचना दिल्यामुळं नगरपालिका निवडणूक जाहीर होण्याआधी शहरांमध्ये रंगत निर्माण झाली आहे.

Dattatray Bharane
Rupesh More: वसंत मोरेंची मोठी घोषणा! मुलाचा फोटो शेअर करत म्हणाले, यंदा माझ्या अंगावर गुलाल पडणारच...

जिल्ह्याच्या आढावा बैठकीत नगरपालिका निवडणुकीबाबत ज्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची मतं जर जाणून घेण्यासाठी येत्या काही दिवसात निर्णय जाहीर करू, अशी माहिती यासंदर्भात राष्ट्रवादीचे मतदारसंघ अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com