Rupesh More: वसंत मोरेंची मोठी घोषणा! मुलाचा फोटो शेअर करत म्हणाले, यंदा माझ्या अंगावर गुलाल पडणारच...

Rupesh More: राज्यात सध्या दिवाळीची धुमधाम सुरु आहे. आणखी दोन दिवसांनंतर दिवाळसणाची सांगता झाल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे.
Vasant More_Rupesh More
Vasant More_Rupesh More
Published on
Updated on

Rupesh More: राज्यात सध्या दिवाळीची धुमधाम सुरु आहे. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस त्यानंतर आणखी दोन दिवसांनंतर दिवाळसणाची सांगता होईल. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून राज्यातील महापालिका निवडणुकांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. ही स्थानिक पातळीवरील निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. आजवर तीन टर्म पुणे महापलिकेत मनसेचा धडाकेबाज नगरसेवक म्हणून ख्याती मिळवलेले वसंत मोरे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळं यंदाची माहापालिका निवडणूक त्यांच्यासाठी कशी असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला असतानाच त्यांनी एक सूचक खुलासा केला आहे. यंदाच्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी वसंत मोरेंचे चिरंजीव रुपेश मोरे याला मैदानात उतवण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.

Vasant More_Rupesh More
Cycle Scheme : 'लेक शिकणार, पुढे जाणार'; मुलींच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी सरकारची खास योजना; कोणती कागदपत्र लागणार?

वसंत मोरेंचे चिरंजीव रुपेश याचा काल २० ऑक्टोबर रोजी वाढदिवस पार पडला. मुलाच्या वाढदिवसानिमित्त वसंत मोरेंनी एक फेसबूक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलाबाबत महत्वाची माहिती दिली. पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, "मी जेव्हा २००७ साली पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा तू पहिलीला शाळेत होता तेव्हापासून सतत १५ वर्ष तुझ्या अंगावर माझ्या प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल पडला आहे. पण यावेळी तुझ्या निवडणुकीत माझ्या अंगावर गुलाल पडणारच ही कात्रजच्या ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथांचीच ईच्छा आहे. रुपेश वसंत मोरे तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..." त्याचबरोबर वसंत मोरे पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर गुलाल उधळला तेव्हाचा जुना फोटो त्यांनी पोस्टसोबत शेअर केला आहे. या फोटोत रुपेश अगदीच लहान शाळकरी मुलगा दिसतो आहे. तर दुसऱ्या एका फोटोत रुपेश कॉलेजचा तरुण दिसतो असून त्याच्या गळ्यात शिवसेनेचा पंचा त्यावर मशालीचं पक्ष चिन्ह दिसतं आहे.

दरम्यान, वसंत मोरेंनी केलेली ही स्पष्टपणे माहिती देणारी पोस्ट आहे. यंदाच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत रुपेश वसंत मोरे याला शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जात आहे. तसंच या निवडणुकीत रुपेशचा नक्कीच विजय होईल, असा विश्वासही वसंत मोरेंनी व्यक्त केला आहे.

Vasant More_Rupesh More
Bharat Gogawale : राष्ट्रवादीवर शिवसेनेचा वार! तटकरेंच्या गोटातील कट्टर नेता गोगावलेंनी फोडला

पण जर वसंत मोरेंचा चिरंजीव नगरसेवकपदाची निवडणूक लढणार असेल तर वसंत मोरेंवर पक्षाकडून आणखी मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते. त्यामुळं मोरे आता शहराच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात सक्रीय होतील, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com