Jaisinghpur : दसरा, दिवाळीच्या तोंडावर राज्यातील ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत कारखानदारांना आदेश करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
उपमु्ख्यमंत्री अजित पवार सर्वेसर्वा असलेल्या बारामती माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि सोमेश्वर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा प्रतिटन जवळपास पाचशे रुपयांपेक्षा जादा भाव दिला आहे, असाच भाव अन्य कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. अजित पवार यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करीत लवकरच कारखानदारांना सूचना करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. ५० हजार रुपयांचे प्रलंबित अनुदान येत्या महिनाभरात सर्वांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वजन काटे आॅनलाइन करण्याबाबत मी आग्रही असून, साखर कारखान्यांनी मॅनलेस वजन काटे उभारावेत. याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वीजबिल भरणा करण्यात आघाडीवर असल्याने तो राज्याच्या वर्गवारीमध्ये ‘अ ‘वर्गात येत असल्याने विनाकपात वीज देण्याच्या सूचना महावितरणला करू, असे आश्वासन अजित पवारांनी दिले.
शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष प्रा.डाॅ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, जर्नादन पाटील, शैलेश आडके, सागर शंभुशेटे, सागर मादनाईक, अण्णा मगदूम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.