Thane Bandh News: मराठा आंदोलक आता मुख्यमंत्र्यांच्या दारी; ठाणे बंद, आंदोलक रस्त्यावर...

Maratha Reservation News: ठाण्यातील सर्वच भागात बंदचा परिणाम दिसून येत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, मराठा समाजाकडून ठिकठिकाणी उपोषणे, आंदोलने केली जात आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

जालन्यातील मराठा आंदोलनात झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ, तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे आज ठाणे बंद पुकारण्यात आला आहे.

Eknath Shinde
Radhakrishna Vikhe Patil News : जरांगे, आता प्रतिष्ठा पणाला लावू नका, उपोषण थांबवायला हवं; विखे पाटील म्हणाले, 'सरकारला संधी द्या...'

ठाण्यातील सर्वच भागात बंदचा परिणाम दिसून येत आहे. ठाण्यातील नौपाडा भाग तसेच कोपरीतदेखील बंद ठेवण्यात आला आहे. जालन्यात झालेल्या प्रकारानंतर आज ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.

Eknath Shinde
Satara Pusesavali News: पुसेसावळीत आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गट भिडले; दगडफेक अन् जाळपोळ

मराठा समाजाच्या रोषाला आता मुख्यमंत्र्यांना सामोरे जावे लागत आहे. ठाणे बंदला व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. सायंकाळी चार वाजता मोर्चातील सहभागी ठाणे महापालिकेसमोर जमणार आहेत.

शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाजाच्या या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? असा जाब आंदोलनकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना विचारला. त्यांना घेराव घातला. जिल्ह्यातील धर्माबाद शहरात हा प्रकार घडला. या प्रकारानंतर आता भाजप नेत्यांनी त्यांचे नांदेडमधील कार्यक्रम रद्द केले आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com