Pandharpur Band : फडणवीस राजीनामा द्या; अन्यथा पंढरपुरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ उधळून लावू , मराठा समाजाचा इशारा

पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होत या घटनेचा निषेध केला.
Pandharpur Band
Pandharpur Band Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. ३ सप्टेंबर) सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर बंदची हाक देण्यात आली होती. शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होत या घटनेचा निषेध केला. (DCM Devendra Fadnavis should resign: Pandharpur protesters demand)

दरम्यान, सकल मराठा समाजाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-टेंभूर्णी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास चालेल्या आंदोलामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्पा झाली होती. सरकारने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीमाना घ्यावा; अन्यथा दहा सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही गायकवाड यांनी दिला.

Pandharpur Band
Ajit Pawar Group NCP Melava : कार्यकर्ते जिलेबी-भातावर ‘तुटून पडले’; पण उपाशी कार्यकर्त्यांनी नेत्यांनाच हासडल्या शिव्या...

जालना जिल्ह्यातील लाठीहल्ल्याचे राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून तीव्र पडसाद उमटत आहेत. शनिवारी येथील मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले होते. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर सकल मराठा समाजाने आज पंढरपूर बंद व तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती.

सकल मराठा समाजाच्या आवाहनाला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.मराठा समाज बांधवांनी स्टेशन रोड, इंदिरा गांधी चौक, अर्बन बॅंक, नाथ चौक, प्रदर्शना मार्गावरुन सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. मोर्चामध्ये असंख्य समाज बांधव सहभागी झाले होते. त्यानंतर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Pandharpur Band
Pawar-Fadnavis Absence In Buldhana : बुलडाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; जालन्यातील लाठीहल्ला ठरले कारण?

दरम्यान, पंढरपूर तालुक्यात आज सकाळपासून पाच ते सहा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास सकल मराठा समाजाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास चालेल्या आंदोलामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्पा झाली होती.

Pandharpur Band
Praful Patel Vs Nana Patole : प्रफुल्ल पटेल-नाना पटोले यांच्यात पुन्हा शाब्दिक वॉर; नैतिक-अनैतिकेतून वार-पलटवार

रोपळे, तुंगत, खर्डी, भंडीशेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या सर्व मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पंढरपूर आगारातून जाणाऱ्या सर्व एसटी बस आगारातच थांबविण्यात आल्या होत्या. पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जूनसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com