Jayant Patil On CM Shinde: ठाण्यातील 'आपला दवाखाना' पाहा; १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

Thane Hospital News: या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Thane Kalwa Hospital: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात १८ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.

राज्यात "आपला दवाखाना" सुरू करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आपल्या शहरातील दवाखान्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची टीका होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना "आपला दवाखाना" घोषणा करण्यापूर्वी आपल्या गावातील "आपला दवाखाना" पाहा," अशी टीका केली आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील दवाखाने आधी सुधारले पाहिजेत,"असे पाटील म्हणाले. सांगलीत ते पत्रकारांशी बोलत होते.

Eknath Shinde
Rohit Pawar Big Statement On Shinde group : रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; शिंदे गटाचे दहा आमदार नाराज, ठाकरेंकडे येण्यासाठी उत्सुक...

"या रुग्णालयाचे ऑडिट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सर्व रुग्ण गंभीर आजाराचे होते, असे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. या प्रकरणावर आरोग्य संचालकांच्या अध्यक्षेखाली समिती नेमली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाण्याच्या रुग्णालयात घडलेली घटना ही दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना दिल्याचे सांगितले.

Eknath Shinde
Sanjay Raut Attack Eknath Shinde : आणखी किती दिवस आराम करणार ? मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर राऊतांचे टीकास्त्र

शिंदे म्हणाले, “हे रुग्ण वेगवेगळ्या दिवशी दाखल झाले होते. एक आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली आहे. यातून जो अहवाल येईल, त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. ठाण्याच्या रुग्णालयात झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची दखल सरकारने गांभीर्याने घेतली आहे,"

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची नवीन आरोग्य योजना आहे. सध्यातरी ठाणे आणि मुंबई शहरात आपला दवाखाना अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत.आगामी काळात राज्यभरात असे 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com