Shambhuraj Desai : ईडीचा गैरवापर कुठे झाला ते जाहीर करा, देसाईंचा सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर!

Shamuraje Desai : ...तर राष्ट्रवादीचे दोन नेते त्याचवेळी जामीनावर सुटले असते.
Shamburaje Desaai
Shamburaje DesaaiSarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : ईडीचा गैरवापर असता तर राष्ट्रवादीचे दोन नेते त्याचवेळी जामीनावर सुटले असते. न्यायालयाने संबंधितांना जामीनावर मोकळे केले असते. मात्र वर्ष-दीड वर्ष जामीन मिळालेला नाही. ते दोषी दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ईडीने कुठे गैरवापर केला ? याचे उदाहरण द्यावे, असे आव्हान उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj desai) यांनीसुळे यांना दिले.

Shamburaje Desaai
Eknath Shinde news| एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर गर्दी कसली?

सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी देसाई यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जिल्ह्यात येऊन पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सुळे यांच्या इडीचा गैरवापर राज्यात सुरु असलेच्या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, इडीचा गैरवापर झाला असता तर राष्ट्रवादीचे दोन नेते त्याचवेळी जामीनावर सुटले असते. गैरवापर असता तर न्यायालयाने जामीनावर त्यांना मोकळे केले असते. मात्र वर्ष-दीडवर्षे संबंधितांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे सकृतदर्शनी ते दोषी दिसत आहेत. त्यांनी कुठे गैरवापर केला हे जाहीर करावे, असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले.

Shamburaje Desaai
बाळासाहेबांचे ‘ते’ वक्तव्य खरं ठरणार? तेजस ठाकरेंची तोडफोड सेना सक्रिय होणार ?

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनशील :

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनशील आहे. कोवीडचा एक रुपयाही निधी देण्याचा राहिलेला नाही. काही तांत्रीक प्रस्ताव थांबले आहेत. अतिवृष्टीत महाविकास आघाडीपेक्षा जास्त निधी दिला आहे. विशेष बाब म्हणुन ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेल्यांनाही मदत देणार आहे. त्यासाठी ७५० कोटी रुपये राखुन ठेवले आहेत. प्रशासनाताली अधिकृत आकडेवाडी घेवुन सुप्रियताईंनी वक्तव्य केले तर योग्य होईल, असे देसाई म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com