Sangola Politics : दीपक साळुंखेंनी वाढविले शहाजीबापू पाटलांचे टेन्शन...

Assembly Election : उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, अशी विनंती करण्यासाठी साक्षात ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी आपण माघार घेणार नाही.
Deepak Salunkhe-Shahji Patil
Deepak Salunkhe-Shahji PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangola News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी पक्षाच्या बूथप्रमखांच्या मेळाव्यात बोलताना ‘या वेळी ब्रह्मदेव जरी आले तरी विधानसभा निवडणूक लढविणारच’ असा निर्धार बोलून दाखवला. साळुंखे यांच्या निर्धारामुळे सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांचे टेन्शन वाढले आहे. तसे त्यांनी नातेपुते येथे झालेल्या मेळाव्यात बोलूनही दाखवले आहे. मागील निवडणुकीतच शहाजी पाटील हे काठावर निवडून आले आहेत. (Deepak Salunkhe increased the tension of Shahjibapu Patil....)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून बैठकांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी सांगोला तालुक्यातील पक्षाच्या बूथप्रमुखांची बैठक घेतली. त्या बैठकीत बूथप्रमुखांनी साळुंखे यांना ठोस भूमिका घेण्यास भाग पाडले. ‘आबा, तुम्ही असाल तरच यंदा आम्हाला सांगा. कोणत्या पक्षाला किंवा नेत्याला पाठिंबा देणार असाल तर आताच आम्हाला निर्णय घेऊ द्या,’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Deepak Salunkhe-Shahji Patil
Thorat Vs Vikhe : विखेंच्या राजकीय ‘खेळी’ला चपराक; थोरातांच्या ‘पीएं’च्या पत्नीला केले उपसरपंच

कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे माजी आमदार साळुंखे यांनाही ठोस भूमिका घ्यावी लागली. आता तुम्ही काळजी करू नका, कामाला लागा. समोर कुणीही आणि कितीही असले तरी आपण विधानसभा लढणारच आहोत. उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, अशी विनंती करण्यासाठी साक्षात ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी आपण माघार घेणार नाही, असे सांगून साळुंखे यांनी ‘अब की बार, आर या पार’ असा सूचक इशाराच त्यांनी दिला.

दरम्यान, मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दीपक साळुंखे यांनी शहाजी पाटील यांना सहकार्य केले होते. साळुंखे यांच्या सहकार्यानंतर आमदार पाटील हे जेमतेम ७६८ मतांनी निवडून आले होते. तत्पूर्वी ते शेकापचे ज्येष्ठ नेते (स्व.) गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देत होते. त्यामुळे साळुंखे ज्यांना पाठिंबा देतात, तो उमेदवार जिंकतो, असे सांगोल्याचे राजकीय गणित आहे. त्यामुळे साळुंखेंचा निर्णय शहाजी पाटील यांना अडचणीत आणणारा आहे.

Deepak Salunkhe-Shahji Patil
Ajit Pawar Group News : सुनावणी सुरू असतानाच अजित पवार गटाचे महत्त्वपूर्ण पाऊल...कर्जतमध्ये ठरणार राजकीय रणनीती

एवढी निवडणूक मला सहकार्य करा, पुढची निवडणूक तुम्ही लढवा, अशी गळ शहाजी पाटील यांनी मागील निवडणुकीत दीपक साळुंखे यांना घातली होती, त्यामुळे साळुंखे यांनी शहाजी पाटील यांना मदत केली होती. आता शहाजी पाटील हे पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. सोबतच शेकापचे तगडे आव्हान असणार आहे. शहाजी पाटील हे विधानसभेची पुन्हा तयारी करत असताना दीपक साळुंखे यांनी आमदारकीसाठी पुन्हा दंड थोपटल्याने आमदारांचे टेन्शन वाढणार आहे.

Deepak Salunkhe-Shahji Patil
Pankaja Munde's CM Post : जानकरांचा शब्द...पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्रिपद अन्‌ चंद्रकांतदादांची सारवासारव...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com