Thorat Vs Vikhe : विखेंच्या राजकीय ‘खेळी’ला चपराक; थोरातांच्या ‘पीएं’च्या पत्नीला केले उपसरपंच

Deputy Sarpanch Election : पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटांमध्ये लढत होती
 Ashvi Budruk Gram Panchayat Membar
Ashvi Budruk Gram Panchayat MembarSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : संगमनेर तालुक्यातील परंतु शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या आश्वी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुणा विजय हिंगे या विजयी झाल्या आहेत. अरुणा हिंगे या काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक विजय हिंगे यांच्या पत्नी आहेत. विजय हिंगे यांच्यावर गेल्या आठवड्यातच विरोधकांकडून राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या संचामध्ये अफरातफरीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Thorat Group Clear Reply to Vikhe politics; Aruna Hinge Deputy Sarpanch of Ashvi Budruk)

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रूक ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच पदासह 15 सदस्यांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटांमध्ये लढत होती. थोरात गटाचे नेतृत्व त्यांचे स्वीय सहायक विजय हिंगे यांनी केले. यात हिंगे यांच्या नेतृत्वाखाली थोरात गटाच्या सरपंच पदासह नऊ जागा जिंकल्या. मंत्री विखे यांच्या गटाला सहा जागांवर समाधान मानावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Ashvi Budruk Gram Panchayat Membar
Ajit Pawar Group News : सुनावणी सुरू असतानाच अजित पवार गटाचे महत्त्वपूर्ण पाऊल...कर्जतमध्ये ठरणार राजकीय रणनीती

आश्वी बुद्रूकच्या उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. सरपंच नामदेव शिंहे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. हिंगे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंचपदासाठी दर्शना ताजणे आणि अरुणा हिंगे यांनी, तर विखे गटाकडून भाऊसाहेब खेमनर यांनी अर्ज दाखल केला होता. दर्शना ताजणे यांनी माघार घेतली. हिंगे व खेमनर यांच्यात निवडणूक झाली.

निवडणुकीत भाऊसाहेब खेमनर यांना सहा मते मिळाली, तर अरुणा हिंगे या दहा मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. उपसरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी काम पाहिले. तलाठी डी. बी. भालचिम यांनी सहकार्य केले. आश्वी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडीवेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 Ashvi Budruk Gram Panchayat Membar
Shahajibapu Patil News : शहाजीबापूंनाही पडू लागली मंत्रिपदाची स्वप्नं; ‘मी शहाजी राजाराम पाटील...अशी शपथ घेऊनच झोपतो’

दरम्यान, विजय हिंगे यांच्याविरोधात गेल्या आठवड्यात विरोधकांनी राजकीय कोंडी केली होती. राज्य सरकार बांधकाम कामगारांना देत असलेल्या संचामध्ये अफरातफरी केल्याची तक्रार केली. या प्रकरणी विजय हिंगे यांच्यावर आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.

 Ashvi Budruk Gram Panchayat Membar
Pankaja Munde's CM Post : जानकरांचा शब्द...पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्रिपद अन्‌ चंद्रकांतदादांची सारवासारव...

विरोधकांच्या या सुडबुद्धीच्या राजकारणाचा थोरात गटाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. ग्रामसभा घेऊन गाव बंद ठेवण्यात आले होते. आता विजय हिंगे यांची पत्नी अरुणा यांची उपसरपंचपदावर निवड होणे, ही विरोधकांच्या राजकारणाला चपराक असल्याची चर्चा गावात रंगली आहे.

 Ashvi Budruk Gram Panchayat Membar
Milk Price Issue : दूध संघांनी सरकारी आदेश धुडकावला; दूधदरात घसरण, संतप्त शेतकऱ्यांकडून आदेशाची होळी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com