शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हा प्रमुख बदलण्याचा मागणी : रावसाहेब खेवरेंवर जाहीर नाराजी

शिवसेनेत दोन गट पडल्यावर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) हे शिंदे गटात गेले.
shivsena
shivsenaSarkarnama

Shivsena : शिवसेनेत दोन गट पडल्यावर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) हे शिंदे गटात गेले. त्यामुळे अहमदनगर उत्तर जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी तालुका मेळावे घेऊन कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यास सुरवात केली आहे. अशा स्थितीत राहाता तालुक्यात झालेल्या शिवसेना मेळाव्यात उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांना हटविण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे राहाता तालुक्यातील शिवसैनिकांतील गटबाजी उफाळून आली आहे.

या मेळाव्याला बबनराव घोलप, माजी आमदार सुनील शिंदे, माजी आमदार योगेश घोलप, अहमदनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन कोते, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, गणेश सोमवंशी आदी उपस्थित होते. या मेळाव्यात उपस्थित असलेले खेवरे मेळावा सुरू असतानाच बबनराव घोलप यांना सांगून निघून गेले. यावर संतप्त झालेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाने चक्क खेवरे यांनाच पदावरून हटविण्याची जाहीरपणे मागणी केली.

shivsena
खासदार लोखंडे यांचा एकदा नव्हे तर चौथ्यांदा नवा घरोबा!

राहाता नगरपालिकेत पठारे व सोमवंशी असे शिवसेनेचे दोन गट आहेत. कार्यक्रमात रावसाहेब खेवरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गणेश सोमवंशी माईकवर बोलत असताना राजेंद्र पठारे यांचे समर्थक शुभम वाघ यांनी सोमवंशींच्या हातातील माईक काढून घेतला. राहाता नगरपालिकेची निवडणूक जवळ आली असताना शिवसेनेतील ही दुफळी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राजेंद्र पठारे म्हणाले, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे मेळाव्याला उपस्थित होते. मात्र मेळाव्यातून जाताना त्यांनी काय कारण सांगून गेले हे मला महिती नाही. ते राहाता विधानसभा मतदार संघात आले की त्यांना काही तरी कारण दिसते. ते इथे थांबतच नाहीत. ते कारण तुम्ही शोधून काढा. त्यांची वायर कुठे आहे आणि त्यांचा फ्युज शोधून काढा म्हणजे शॉकसर्किट होणार नाही, अशी विनंतीच त्यांनी बबनराव घोलपांकडे केली.

shivsena
संतप्त शिवसैनिकाचा खासदार लोखंडेंना सवाल : माझ्या मताचा सौदा केवढ्याला केला?

ते पुढे म्हणाले की, राहाता तालुक्यात फार मोठे कार्यक्रम शिवसेनेकडून घेण्यात आले. या कार्यक्रमाला खेवरेंना बोलावले तर ते काही तरी थापा मारतात. पावसाळ्यात जसे बेडकं बाहेर येतात तसे काही कार्यकर्ते जागे होतात. त्यांना ते खतपाणी करतात. अशा कार्यकर्त्यांनी घरीच रहावे. शिवसैनिक भक्कम आहे. बबनराव घोलप यांनाच खासदार करण्यासाठी सर्वांनी एकत्र व्हायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

shivsena
खासदार लोखंडेंना दहा फोन केले तरीही ते गेलेच : संतप्त शिवसेना जिल्हा प्रमुखाने दिले हे आव्हान...

खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील आठ वर्षांत शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याचे काम केले नाही. लोक लोखंडेंवर नाखूष आहेत. आम्ही ज्यावेळी सांगत होतो. हा लोखंडे भाजपचे काम करत आहे. त्यांच्याबरोबरच राहत आहे. शिवसैनिकाचे काम होत नाही, या आमच्या म्हणण्याकडे दुर्दैवाने कोणी लक्ष दिले नाही. लोखंडे तिकडे गेले असले तरी दिवसा आपल्यात व रात्री त्यांच्यात असे लोकही आपल्याला शोधावे लागणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com