Sanjay Telnade : काँग्रेसच्या तडीपार नेत्याची कार्यक्रमाला हजेरी, भाषणही ठोकले; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

Congress Sanjay Telnade Video viral : इचलकरंजी शहरात असलेला एसटी गँगचा म्होरक्या आणि काँग्रेसचा नेता संजय तेलनाडे हा कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार आहे. एक वर्षासाठी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
sanjay Telnade Video viral
sanjay Telnade Video viralsarkarnama

Sanjay Telnade News : पोलिसांचा धाक कमी झालाय का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असलेला काँग्रेसचा नेता इचलकरंजी शहरात आला. दिवसभर शहरात फिरला. त्याने काँग्रेसच्या एका कार्यक्रमला हजेरी देखील लावली. या कार्यक्रमात त्याने जोरदार भाषण ठोकले. या भाषणा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आलीआहे.

इचलकरंजी शहरात असलेला एसटी गँगचा म्होरक्या आणि काँग्रेसचा नेता संजय तेलनाडे हा कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार आहे. एक वर्षासाठी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी (ता.4) एका खटल्याच्या साक्ष देण्याच्या निमित्ताने तो इचलकरंजी शहरात आला होता. पण शहरात दिवसभर त्याचा वावर होता. हद्दपारची कारवाई असतानाही तो शहरात बिनधास्तपणे सर्वत्र वावरला.

इचलकरंजी काँग्रेस Congress कमिटीत झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या आभार सभेला संजय तेलनाडे याने उपस्थिती लावली. त्यात त्याने भाषण ठोकले. तो व्हिडिओ रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या एका नेत्याच्या इन्स्टाग्राम रिल्सवर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तडीपार तेलनाडे शहरातच फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.

sanjay Telnade Video viral
Vidhan Parishad Election: विधानपरिषद निवडणूक अटळ? आज फैसला; आमच्याकडे पुरेसे संख्याबळ, महायुतीच्या भूमिकेनंतर...

पहिल्या रांगेचा मान

काँग्रेस कमिटीत झालेल्या या कार्यक्रमाला महविकास आघाडीतील घटक पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात नेत्यांच्या पहिल्या रांगेत संजय तेलनाडे बराच वेळ बसून होता. त्याने जोरदार राजकीय भाषणही केले.

या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हद्दपार कारवाईच्या नियमाचा भंग झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे गावभाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी कारवाई करण्याच्या सूचना शिवाजीनगर पोलिस Police ठाण्याला दिल्या आहेत.

पोलिस अधीक्षकांकडे अहवाल पाठवणार

पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी सांगितले की, हद्दपारीच्या ठिकाणाहून तेलनाडे याने काही दिवसांपूर्वी शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तो ऑनलाईनरीत्या शहरात येण्याचा प्रयत्न करत होता. खटल्याची साक्ष देण्यासाठी प्रत्यक्ष शहरात आला. मात्र, तसाच परत न जाता तो शहरभर वावरला. लपून छपून नाही तर तो थेटपणे सर्वत्र पोलिसांसमोरच फिरला. याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे पाठवला जाणार असून त्यानुसारच याप्रकरणी पुढील कारवाई केली जाणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com