Marathwada Teacher Constituency : छप्पन टेबलवर ५३ हजार मते मोजण्यासाठी सातशे अधिकारी-कर्मचारी...

Marathwada :२५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील.
Marathwada Teachers Constituency Election News
Marathwada Teachers Constituency Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. (Marathwada Teacher Constituency) चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून १ फेब्रुवारी रोजी मतमोजणीच्या ठिकाणीच दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Marathwada Teachers Constituency Election News
Marathwada News : नांदेडला दोनवेळा मुख्यमंत्री पद तरीही विकास झाला नाही, म्हणून चंद्रशेखर राव महाराष्ट्रात..

शिक्षक मतदारसंघासाठी (Aurangabad) औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांत एकूण ५३ हजार २५७ मतदारांनी मतदान केले. मतमोजणीच्या ठिकाणी ५६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी ७०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Marathwada) मतमोजणीची सुरूवात सकाळी ८ वाजल्यापासून होणार आहे. सुरूवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल.

त्यानंतर २५ मतपत्रिकेचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिकांचे सरमिसळ करण्यात येईल. यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मताप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल.

मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे. तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनी देखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थाबावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com