Satara : प्रतापराव गुजरांच्‍या वंशजांचा मांजरेकरांच्‍या चित्रपटाला विरोध...

खटाव तालुक्यातील khatav taluka प्रसिद्ध ‘क’ पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले सरसेनापती प्रतापराव गुजर Prataprao Gujar यांचे गाव असून त्या जागी जर कोकणातील Kokan गाव दाखवले आहे.
Manjarekars Film
Manjarekars Filmsarkarnama
Published on
Updated on

सातारा : गेल्या आठवड्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा करून त्याचा टीझर लाँच केला होता. या चित्रपटात प्रतापराव गुजर यांचे गाव भोसरे (ता. खटाव) असताना कोकणातील गाव दाखवण्यात आले आहे. मांजरेकरांनी या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतीकरण केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप कणसे आणि भोसरे ग्रामस्थांच्यावतीने प्रतापराव गुजर यांच्या वंशजांनी दिला आहे.

सुरेश गुजर म्हणाले,‘‘महेश मांजरेकर यांनी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात इतिहासाचे विद्रूपीकरण केले आहे. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे मुळशी पॅटर्न बनवणे इतका सोपा नाही. खरा इतिहास जर दाबला जाणार असेल तर त्या चित्रपटांना अर्थ नाही. भोसरे हे खटाव तालुक्यातील प्रसिद्ध ‘क’ पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे गाव असून त्या जागी जर कोकणातील गाव दाखवले जात असेल तर सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाचे किती विकृतीकरण केले जात आहे.

इतिहासामध्ये प्रतापराव गुजर यांच्या सोबतीने विसाजी बल्लाळ, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे ही हुतात्म्यांची नावे असताना त्यांची नावे डावलून दत्ताजी पागे, जिवाजी पाटील, चंद्राजी कोठार, मल्हारी लोखंडे, सूर्याजी दांडकर आणि तुळजा जामकर ही काल्पनिक नावे घेण्यात आली आहेत. ही इतिहासाची मोडतोड म्हणजे स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या शुरवीरांचा अपमान आहे.

Manjarekars Film
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मांजरेकरांनी आपल्या वाडवडिलांचा चित्रपट बनवून त्याच्यात पुत्राला लॉन्च करावे. सत्या नावाचा हा अभिनेता मावळा म्हणून अजिबात शोभत नाही. याचबरोबर प्रतापरावांच्या भूमिकेत प्रवीण तरडे असून त्यांची देहबोली प्रतापरावांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेशी अजिबात जुळत नाही. त्यांचा पेहराव सुद्धा दरोडेखोरासारखा दाखवण्यात आल्याचे श्री. गुजर यांनी सांगितले.

Manjarekars Film
BJP : सातारा लोकसभेसह कऱ्हाड दक्षिणमध्ये कमळ फुलविणार... बाळा भेगडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com