Patan News : कमी क्षमता असूनही पालकमंत्री देसाईंचा साखर कारखाना दरात राज्यात अग्रेसर

Shambhuraj Desai दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Eknath Shinde, Shambhuraj Desai
Eknath Shinde, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

-अरूण गुरव

Patan News : महाराष्ट्र राज्यात १२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असणारे अनेक कारखाने आहेत. मात्र, या सर्व कारखान्यात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने कमी गाळप क्षमता असणाऱ्या इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे. त्यामुळे हा कारखाना राज्यात अग्रेसर ठरला आहे. राज्यातील सरकार साखर कारखानदारीच्या पाठीशी ठाम असल्याचे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

दौलतनगर (ता. पाटण) Patan Taluka येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शंभूराज देसाई Shambhuraj Desai बोलत होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, जयराज देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. बाबूराव नांगरे उपस्थित होते.

शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत. मात्र, 1250 मेट्रिक टनाची गाळप क्षमता असणाऱ्या देसाई कारखान्याने अतिशय चांगली कामगिरी करून जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीत शेतकऱ्यांच्या उसाला दर दिला आहे.

राज्य सरकारने केंद्रातील सरकारला विनंती करून राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा इन्कम टॅक्सबाबतचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी विनंती केली. मोदी सरकारने इन्कम टॅक्सचा प्रश्न तडीस नेला. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांचे साडेसात हजार कोटी माफ झाले. त्यामध्ये देसाई कारखान्याचे 55 कोटी रुपयांचा समावेश आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व साखर कारखान्यांना झाल्याचे त्यांनी सांगितले.

यशराज देसाई म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 1250 मेट्रिक टनाचा हा कारखाना तीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे. तसेच देसाई कारखाना क्षेत्रातील सभासदांची एफआरपीची उर्वरित रक्कम लवकरच शेतकरी सभासदांच्या थेट खात्यांवर जमा केली जाईल.

Edited By Umesh Bambare

Eknath Shinde, Shambhuraj Desai
Karad Congress News : जातनिहाय जनगणनेचा काँग्रेसचा आग्रह; पण हे मोदींना मान्य नाही...पृथ्वीराज चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com