Devendra Fadnavis : मी मदत केली, त्यांनी विश्वासघात, त्यांचा सत्यानाश होणार; फडणवीसांचा मोहिते पाटलांना इशारा

Madha Lok Sabha Constituency : जे पवारांना जमले नाही ते तुम्ही पाच वर्षांत करून दाखवले. याचाच राग पवारांना आहे. आता जर पुन्हा तुम्ही निवडून आला तर त्यांची सर्व दुकानदारी बंद होईल, याचीच त्यांना भीती आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Madha Political News : शरद पवारांनी बाजूला केल्यानंतर मोहिते पाटील माझ्याकडे आले. त्यावेळी त्यांना आधार दिला. त्यांचे पुनर्वसन केले. त्यांच्यावर विश्वास टाकला. आता फरतफेड करण्याची वेळ आली तर ते सोडून गेले. पुन्हा पवारांची साथ दिली. राजकारणी नसल्याने मला त्याचे दुःख वाटत नाही. मात्र, माझा विश्वासघात करणाऱ्यांचा सत्यानाश झालेला आहे, तसेच आताही होईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह उत्तम जानकर यांना इशारा दिला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी शरद पवार, मोहिते पाटलांसह उत्तम जानकर यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, ज्या लोकांना जवळ केले त्यांनी किंमत ठेवली नाही. पवारांनी त्यांची सर्व दुकानदारी बंद केली होती. त्यांचे राजकारण संपवले होते. त्यावेळी ते आमच्याकडे आले. ही जुनीजाणती मंडळी म्हणून त्यांना जवळ केले. त्यांच्या घराण्याची काही ना काही पुण्याई आहे. त्यांना फक्त जवळ केले नाही तर त्यांचे राजकारणात आणि कारखान्यातही पुनर्वसन केले.

आता खऱ्या अर्थाने परतफेड करण्याची वेळ आली होती, त्यावेळी त्यांनी पुन्हा पवारांचा हात पकडला. मला आता त्याची चिंता नाही. मला विश्वास आहे, की जनतेच्या मानत पंतप्रधान मोदी आहेत. त्यामुळे कोणी कितीही विश्वासघात केला, तरी जनता विकासकामाला जागून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून देतील.

जे पवारांना जमले नाही ते निंबाळकरांनी पाच वर्षांत करून दाखवले. याचाच राग पवारांना आहे. आता जर पुन्हा रणजित नाईक निंबाळकर निवडून आले तर त्यांची सर्व दुकानदारी बंद होईल, याचीच भीती पवार, मोहिते पाटलांना आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

Devendra Fadnavis
Ranjeetsinha Naik-Nimbalkar : निंबाळकरांनी 50 वर्षांची हिस्ट्रीच काढली; धैर्यशील अन् रणजितसिंह मोहिते-पाटलांवर वार

उत्तम जानकरांचा पोपट असा उल्लेख

आता तुमच्याकडचे काही पोपट बोलायला लागलेत. त्यांनाही आम्ही मोठे केले. विमानात बसवून बोलावून घेतले. ते अजितदादांवर बोलतात, भाजपवर टीका करतात. रातोरात त्यांना आता राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वाटू लागले आहे. त्यांना मोठे करण्यात माळशिरसची जनता आहे. जनतेला वाटले होते, की ते संघर्ष करतील, पण त्यांनी समझोता केला. आता जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : 'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी!; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

मी राजकारणी नाही. मला याला पाड, त्याला गाड असे छक्के पंजे जमले नाहीत. ते मी उभ्या आयुष्यात केले नाही. मात्र, माझा विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो. इतिहास पाहा, मी काहीच केले नाही, असे म्हणत फडणवीसांनी मोहिते पाटील आणि उत्तर जानकरांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांचे अस्तित्वच नाही

देशात 543 खासदार निवडून द्यायचे आहेत. त्यात शरद पवार गटाचे फक्त दहा उमेदवार आहेत. ही संख्या खूपच कमी आहे. त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. किंवा सर्वच्या सर्व निवडून आले तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे शरद पवारांचे अस्तित्वच आता उरले नाही, असा खोचक टोलाही फडणवीसांनी पवारांना लगावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Devendra Fadnavis
Ajit Pawar Baramati : इकडं-तिकडं पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com