Ranjeetsinha Naik-Nimbalkar : निंबाळकरांनी 50 वर्षांची हिस्ट्रीच काढली; धैर्यशील अन् रणजितसिंह मोहिते-पाटलांवर वार

Madha Lok Sabha Constituency : शेतकऱ्यांची देणी देता येत नाही. त्यामुळे दबाव निर्माण करण्यासाठी मोहिते-पाटलांना सत्ता हवी आहे
Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Dhairyasheel Mohite Patil
Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Dhairyasheel Mohite PatilSarkarnama

Madha Political News : माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एक कमळ फुलवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघात तीन सभा घेतल्या. सांगोल्यात झालेल्या सभेत उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ताटाला भोक पाडणारी ही औलाद आहे. गद्दारी यांच्या नसानसात भरली आहे, अशा शब्दांत निंबाळकर यांनी मोहिते-पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

रणजितसिंह निंबाळकर Ranjeetsinha Naik-Nimbalkar यांनी भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही लक्ष्य केलं आहे. तसेच, शेतकऱ्यांची देणी देता येत नाही. त्यामुळे दबाव निर्माण करण्यासाठी मोहिते-पाटलांना सत्ता हवी आहे, असा आरोपही निंबाळकरांनी केला आहे.

'त्यांच्या' नसासनात गद्दारी

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, "विरोधी उमेदवार (धैर्यशील मोहिते-पाटील) आमच्याबरोबर मागील महिन्यात एकत्र जेवण करत होते. त्यांचं जेवण सुद्धा जिरलं नाही. रात्री ताटाला भोके पाडणारी ही औलाद आहे. गद्दारी यांच्या नसासनात भरली आहे. ग्रामपंचायत सदस्य, आमदारकी, जिल्हापरिषद सदस्य, कारखान्याचं चेअरमनपद सुद्धा यांना घरात पाहिजे. उद्या ग्रामपंचायतीत एखाद्या शिपायचं पद निघालं, तरी एखादे मोहिते-पाटील Dhairyasheel Mohite Patil आणून उभे करतील. सर्वसामान्यांसाठी यांना काही करायचं नाही."

Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Dhairyasheel Mohite Patil
Uddhav Thackeray : 'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी!; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

शरद पवारांना आदर्श उमेदवार सापडला?

धैर्यशील माहिते-पाटलांवर 31 गुन्हे दाखल आहेत. लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे. असा आदर्श उमेदवार शरद पवारांना Sharad Pawar सापडला. या आदर्श उमेदवाराला शरद पवार सगळीकडे घेऊन फिरत आहेत. धैर्यशील मोहिते-पाटलांना तिकीट न मिळण्याचं कारण प्रतिज्ञापत्र आहे. भाजपला सगळ्या निकषात बसणार उमेदवार पाहिजे. एक घरात केंद्रीकरण नको पाहिजे होते, असं रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं.

Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Dhairyasheel Mohite Patil
Mumbai Congress : कल्याणमध्ये काँग्रेसला बसणार धक्का; नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर?

हजारो शेतकऱ्यांची देणी बाकी

पक्ष जो उमेदवार देईल, त्याचं प्रामाणिकपणे काम करणार होतो. पण, यांना सगळी सत्ता स्वत:च्या वाड्यावर केंद्रीत करायची होती. लोकशाही दाबायची होती. सुनेत्रा पतसंस्था, विजय पतसंस्था, रत्नप्रभा बँक बंद पाडली, हजारो शेतकऱ्यांची देणी मोहिते-पाटलांनी दिली नाहीत. शेतकऱ्यांची देणी द्यायची नाहीत. त्यामुळे दबाव निर्माण करण्यासाठी मोहिते-पाटलांना सत्ता हवी होती. माढा लोकसभेचा विकास करायचा नाही. विकास करायचा असता, तर 50 वर्षांत केला असता, अशा शब्दांत निंबाळकरांनी टीकास्त्र डागलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकांना भावनिक करण्याचं काम केलं

"रणजितसिंह मोहिते-पाटील Ranjeetsingh Mohite Patil खासदार झाले होते. एक बंधारा रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बांधला का? रेल्वेचा प्रश्न सोडवला का? निरा देवधर, सांगोला उपसा सिंचनचा प्रश्न यांनी सोडवला नाही. फक्त लोकांना भावनिक करण्याचं काम केलं जातं, असा हल्लाबोलही रणजितसिंह निंबाळकरांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Dhairyasheel Mohite Patil
Ajit Pawar Baramati : इकडं-तिकडं पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com