अनिल कदम -
Sangli Bjp Politics News :
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेपार्ह उल्लेख केला. तसेच सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न इस्लामपूरचे माजी नगरसेवक संग्राम पाटील यांच्याकडून करण्यात आला. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप नेते आणि कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहेत. याविरोधात BJP चे इस्लामपूर मंडलाचे अध्यक्ष अशोक खोत यांनी पोलिसांत तक्रारी दाखल केली आहे.
उरुण-इस्लामपूर शहरातील माजी नगरसेवक संग्राम पाटील मागील काही दिवसांपासून वादात आहेत. सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात विघ्न आणण्याची फेसबुक पोस्ट केली होती. तसेच व्हॉट्सअॅपवरही शेअर केले होते. याशिवाय मुंबईजवळ मीरारोड येथे घडलेल्या घटनेनंतर राज्य शासनाने केलेल्या कारवाईबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करीत सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
माजी नगरसेवक पाटील यांच्याकडून जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी कार्यकर्ते व संघटनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शहरातील सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईत मराठा आंदोलन शांततेत पार पडले आहे. तसेच राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याने पाचशे वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली. देशभर उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. परंतु नगरसेवक पदावर काम केलेल्या व्यक्तीकडून राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरून चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा आरोप आहे.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकून बदनामी करणार्या माजी नगरसेवकास अटक करण्यात यावी, अशी मागणी करत याबाबतची तक्रार भाजपच्या पदाधिकार्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात केली आहे.
बदनामी करणार्या माजी नगरसेवकावर तात्काळ कारवाई करा. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष खोत यांनी दिला आहे. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक सुभाष शिंगण, सरचिटणीस प्रवीण परीट, उपाध्यक्ष भास्कर मोरे, युवक अध्यक्ष सतेज पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप पवार, प्रमोद मोरे, जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी सरचिटणीस अल्ताफ तहसीलदार, रणधीर जाधव, आप्पा शिंदे, कादर मुंडे आदी. उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.