Sangli News : देशभर लोकसभा निवडणुकीचा माहौल तयार झाल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करीत असताना काँग्रेसही मोर्चेबांधणीत व्यस्त आहे. पक्षाकडून प्रत्येक राज्यासाठी स्क्रीनिंग समिती बनवली जात आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने लोकसभा निवडणुकीसाठी सहा राज्यांच्या स्क्रीनिंग कमिटी सदस्यपदी आमदार डॉ. विश्वजित कदम यांची नियुक्ती केली आहे. सांगली लोकसभेची आमदार कदम यांच्यावर जबाबदारी असताना अन्य सहा राज्यांची जबाबदारी देऊन त्यांना बढती दिल्याचे मानले जात आहे. (MLA Vishwajeet Kadam appointed to Congress Screening Committee)
लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. काँग्रेसनेही भाजपला टक्कर देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत संघटन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी गतवर्षी काढलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी झाली होती. (Vishwajeet Kadam's Promotion)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या यात्रेचे नियोजन माजी मंत्री तथा आमदार विश्वजित कदम यांनी केले होते. महाराष्ट्रात यात्रेला मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता राहुल गांधी यांनी विश्वजित कदम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. भारत जोडो यात्रेच्या यशस्वी नियोजनानंतर कदम यांच्यावर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्याचाही निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राज्यांसाठी नुकतीच स्क्रीनिंग समिती निवडली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्ष नेतृत्वाकडून आमदार कदम यांच्या अंगी असलेल्या संघटनशक्तीची दखल घेत सहा राज्यांच्या समितीवर त्यांची निवड केली आहे.
स्क्रीनिंग समितीच्या माध्यमातून संबंधित राज्यांत लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, पुद्दुच्चेरी या सहा राज्यांच्या स्क्रीनिंग कमिटीवर कदम यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे कदम यांना पक्षाने बढती दिल्याचे स्पष्ट झाले.
पक्षातील ही मोठी जबाबदारी असणारी स्क्रीनिंग समिती आहे. समितीने घेतलेली जबाबदारी, निश्चित केलेले उमेदवार आणि त्यांना मिळालेले यश यामुळे आमदार कदम यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. पक्ष नेतृत्वाने कदम यांना देशपातळीवर मोठी संधी दिल्याने जिल्ह्यातील कार्यकर्तेही समाधानी आहेत, ती जबाबदारी आमदार कदम हे यशस्वीरीत्या पार पाडतील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
Edited By : Vijay Dudhale
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.