Ajit Pawar : सोलापुरात अजित पवार गट 'अ‍ॅक्टिव्ह'; शरद पवारांना देणार तगडी फाईट...

Sharad Pawar Vs Ajit Pawar : जिल्हा कार्यकारिणीसाठी अजित पवार गटाला अखेर मुहूर्त
Solapur Ajit Pawar Group
Solapur Ajit Pawar GroupSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सोलापूरचे चार दौरे केले. या काळात अजित पवार गटाचे याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा होती. जिल्हाकार्यकारिणीसाठी या गटाला अखेर मुहूर्त सापडला आहे. लांबणीवर पडलेल्या सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून अजित पवार गट शरद पवारांना तगडी फाईट देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेत वाटा मिळूनही पदाधिकारी निवडी लांबणीवर टाकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) जिल्हा पदाधिकारी निवडी केला आहेत. जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटलांनी या निवडी जाहीर केले असून मंगळवेढ्यातील बारा जणांना या जिल्ह्यात संधी दिली आहे. यात सर्व माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवकांनाच संधी दिल्याचे दिसून येत आहे.

Solapur Ajit Pawar Group
Advocate Couple Death : आधी पाच तास छळ, नंतर हत्या; वकील दाम्पत्य हत्याप्रकरणी खळबळजनक माहिती समोर

यांची लागली वर्णी

या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रांतिक सदस्य म्हणून माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे व अरुण किल्लेदारांना संधी दिली. जिल्हा उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, तर खजिनदार म्हणून राजेंद्र हजारे यांची निवड केली आहे. सरचिटणीस सोमनाथ माळी, तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी शंकर माळी व भारत नागणे यांना संधी मिळाली आहे.

पंढरपूर विधानसभा अध्यक्षपदी माजी नगरसेवक अजित जगताप, तर कार्याध्यक्ष शिवबाळा शिवगोंडा पाटील यांची निवड केली आहे. तालुकाध्यक्ष भारत बेदरे, तर शहराध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे, शहर कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक बशीर बागवान यांची वर्णी लागलेली आहे.

Solapur Ajit Pawar Group
Eknath Khadse : सरकारनं आजचं मरण उद्यावर ढकललं; एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री पवारांच्या गटातून पदाधिकारी निवडी आतापर्यंत रखडलेल्या होत्या. नव्या पदाधिकारी निवडीबद्दल चलबिचल होत होती. दरम्यान, प्रबळ विरोधक असलेल्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटाने तालुक्यात निवडीसह विविध कार्यक्रमांतून मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. अजित पवारांच्या गटात मात्र शांतता होती.

आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना अद्यापही अजित पवार गटांची कोणतीही तयारी नव्हती. परिणामी आगामी निवडणुकांना कसे सामोरे जाणार, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत होते. यातच जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटलांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शुक्रवारी नगरपालिकेच्या विकास कामावरून भाजप आमदार समाधान आवताडे यांनी याच गटावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला होता. भविष्यात मात्र याच गटाला सोबत घेऊन राजकीय बांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे झालेल्या निवडी तालुक्यातील राजकीय बांधणीसाठी निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय हा गट महायुतीचा घटक पक्ष म्हणून जुळवून घेणार की नाही, हे देखील भविष्यात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोलापुरच्या राजकीय घडामोडींना आता वेग आल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Solapur Ajit Pawar Group
Pravin Gaikwad : मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळालं का? प्रवीण गायकवाडांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com