Satara Loksabha : '' ...त्यामुळे सातारा लोकसभा जागेवर आमचाच अधिकार'' ; शिंदे गटाचा दावा!

Shivsena Sharad Kanse News : कराड येथे लोकसभा आढावा बैठकीनंतर सातारा संपर्क प्रमुख शरद कणसेंनी केलं आहे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

विशाल वामनराव पाटील -

Satara News : मागील 25 वर्षापासून भाजपा- शिवसेना ही आमची नैसर्गिक युती आहे. आमच्या युती धर्मात सातारा लोकसभेची जागा कायम शिवसेनेला सोडलेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या जागेवर आमचा अधिकार असल्याने ती जागा शिवसेनेला(शिंदे गट) सुटेल, असा विश्वास सातारा संपर्क प्रमुख शरद कणसे यांनी व्यक्त केला आहे. कराड येथे लोकसभा आढावा बैठक पार पडली.

राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती असून सरकार म्हणून एकत्रित असले तरी राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच दावे- प्रतिदावे सुरू झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी 'शिवसेना'ही झाली सक्रिय ; शिवतारे, कणसेंवर विशेष जबाबदारी!

पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, सातारा जागेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लढणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक नेत्यांनी सातारा लोकसभेला भाजपाचाच उमेदवार असल्याचा दावा केला.

अजित पवार, भाजपा यांच्यानंतर महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे(Eknath Shinde) संपर्क प्रमुख शरद कणसे यांनीही कराड येथील आढावा बैठकीत सातारा लोकसभेवर दावा केला आहे. एवढेच नाही तर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनाच जागा लढत असल्याचेही म्हटले आहे.   

कराड येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना (शिंदे गट) सातारा लोकसभा आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाऊ शेलार, पुरूषोत्तम जाधव, कराड पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, रणजित पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माने, तालुकाध्यक्ष काकासाहेब चव्हाण, सुलोचना पवार, अक्षय मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.   

Eknath Shinde
Narendra Patil : सातारा लोकसभेसाठी नरेंद्र पाटलांनी पुन्हा ठोकले शड्डू ; माध्यमांसमोर केलं सूचक विधान, म्हणाले...

सातारा लोकसभा मतदार संघावर महायुतीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप(BJP) या तिघांनी दावा केला. यामध्ये शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी आपण निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. भाजपाकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील(Narendra Patil) हेही शड्डू ठोकून तयार आहेत. तर अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून कोणीही वैयक्तिक दावा केला नसला तरी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभेची जागा स्वतः कडे ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

सातारा जिल्हा 1999 पासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून खासदारही राष्ट्रवादीचाच राहिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महायुतीतच सातारा लोकसभेच्या जागेवरून तिढा वाढलेला पहायला मिळत आहे. आता या जागेबाबतचा अंतिम निर्णय तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाच घ्यावा लागणार असून यावेळी चांगलीच कसरत होणार असल्याचे दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com