BJP Minister Harassment Woman : वादग्रस्त प्रकरणामुळे फडणवीसांचे आणखी एक मंत्री अडचणीत

Sanjay Raut On Jaykumar Gore : धनंजय मुंडे प्रकरणामुळे महायुती सरकार अडचणीत आलेले असताना राज्यातील आणखी एका मंत्र्यावर आरोप झाले आहेत
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मुंबई : देशभरात गाजलेल्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर महायुती सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. "जयकुमार गोरे यांनी विकृतीचा कळस गाठला आहे आणि त्यांच्याविरोधात पुरावे समोर आले आहेत", अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

महायुती सरकारच्या काळात राज्यात ‘लाडक्या बहिणी’ सुरक्षित नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर याच प्रश्नावरून विधीमंडळाच्या अधिवेशनात सरकारवर विरोधक तुटून पडताना दिसत आहेत. अशातच सरकारमधील मंत्र्यांचा विकृतीचा कळस समोर आला आहे. याप्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

तसेच राऊत यांनी पत्रकारांनी गोरे यांचादेखील आता शिवसेना राजीनामा मागणार का? असा सवाल केला होता. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, "राजीनामा कसला मागता? अशा मंत्र्‍यांना लाथ मारून मंत्रिमंडळाबाहेर काढले पाहिजे. हे मंत्री महिलांचा विनयभंग करणारे आहेत. असे मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांवरील अत्याचाराविरोधात बोलणार आहेत?"

Devendra Fadnavis
Jaykumar Gore : दीपकआबा, ती उधारी वसूल करायलाच तुम्हाला स्टेजवर बसवलंय;जयकुमार गोरेंची तुफान टोलेबाजी

राऊत यांनी फडणवीस यांच्यावर देखील निशाना साधला असून गोरे यांच्यासारख्या मंत्र्यांना सोबत घेऊन महिला सबलीकरणावर आता कसे बोलणार असा सवाल केलाय. ते आता लाडक्या बहिणींवर बोलणार आहे का? हा प्रश्न आहे. सध्या प्रश्न नैतिकतेवरून विचारला जात असून विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमचं पाहू. पण, यावर सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस काय करत आहेत? याबाबत आता केंद्राकडे पत्र व्यवहार करणार आहे. अमित शहा यांना देखील पत्र पाठवून यात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचेही राऊत म्हणाले.

लज्जास्पद मंत्र्यांची यादी वाढतीय

जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने स्वत:चे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप केला. यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. 'सध्या सरकारमध्ये उभा धिंगाणा सुरू आहे. एक पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आपले विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. दहा दिवस तुरुंगाची हवा खातो. पण, मंत्री झाल्यावर महिलेच्या मागे लागतो. आणखी एक महाभाग उत्तर महाराष्ट्रातील मंत्री माजी महिला राष्ट्रपतींची जमीन ढापतो. हा मंत्री मंत्रिमंडळात मान वर करून फिरतो. यापेक्षा लज्जास्पद काय असू शकते. सध्या काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी वाढत चालली असून अशांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का?' असा सवाल मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com