Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे-पाटील नेमके कुणाच्या 'टार्गेट'वर ?

BJP Targets Vikhe Patil : दिल्लीच्या राजकारणात विखे पाटलांचा कायम वावर
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Ahmednagar Political News : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीचे सोमवारी नियोजन विभागाने पुनर्गठन केले. हे करताना समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना डच्चू दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे विखे पाटलांना वगळताना राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटलांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे विखेंच्या समितीतून गच्छंतीमागे नेमके कोण, अशी चर्चा झडू लागली आहे. (Latest Political News)

याबाबत खुद्द राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी संयमित प्रतिक्रिया देत वाद नसल्याचे सांगितले आहे. मात्र विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार रोहित पवार आदींनी विखेंना सहनुभूती दाखवण्याचा प्रयत्न करत इतर पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांचे कसे खच्चीकरण केले जाते, त्यांना संपवण्याचा भाजप कसा प्रयत्न करतो, याबाबत माहिती देत रान पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विरोधक टीकेची संधी सोडत नसतानाच विखेंना समितीमधून वगळल्याने भाजपवर प्रहार सुरू झाले आहे. भाजपमध्ये आल्यानंतर सुरुवातीपासूनच विखे परिवाराने थेट दिल्ली दरबारी आपले संबंध प्रस्थापित केलेले आहेत. यातून विखेंना राज्यात 'टार्गेट' केले जात आहे का? यासाठी महायुतीत सहभागी असलेल्या इतर सहकारी पक्षांचा यात हातभार लागत आहे का, असे प्रश्न उपस्थित करून राजकीय वातावरणात धुरळा उठला आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Sharad Pawar : मोठी बातमी ! 'इंडिया'वर शरद पवारांची छाप; खर्गेंचे 'पॅकअप'?

पायाभूत सुविधा समितीमधून विखेंना वगळताना अजित पवार (Ajit Pawar) आणि दिलीप वळसे यांची वर्णी लागलेली आहे. याला पवार-विखेंमधील असलेल्या राजकीय संघर्षाची किनार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच कुरघोडीतून भाजपातील एका गटाने समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा गेम केला का ? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विखे परिवाराने पूर्वी काँग्रेस असो वा आता भाजप, पक्षाच्या दिल्लीतील शीर्ष वर्तुळात आपली स्वतंत्र ओळख आणि संपर्क ठेवलेला आहे. आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांनिमित्त महत्वाचे केंद्रीय नेते, मंत्री यांना विशेष निमंत्रित करून संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला. विखेंची हीच खेळी पूर्वी काँग्रेस तर आता भाजपातील राज्यातील नेत्यांना खटकत असल्याचे बोलले जाते. यातून विखे ज्या पक्षात असतात तेव्हा राज्यातील मुख्यमंत्री पद बदलाच्या हालचाली सुरू असताना त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येते, असेही वारंवार घडले आहे.

Radhakrishna Vikhe Patil
INDIA Mumbai Meet : हमीभावासाठी शेतकरी हातात नांगर घेऊन 'इंडिया' बैठकीच्या सप्ततारांकित हॉटेलात घुसणार..

राज्यातील गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकलानंतर राधाकृष्ण विखेंचे नाव मध्यंतरी चर्चेत होते. दिल्लीत खासदार सुजय विखे, राधाकृष्ण विखेंसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. वर्षभरात शिर्डी, लोणी प्रवरात गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राष्ट्रपती दौपदी मुर्मु, राजनाथसिंह आदी नेते मंडळी येण्यास विखे परिवाराचे प्रयत्न उघड आहेत. मध्यंतरी खासदार सुजय विखेंच्या पत्नी डॉ. धनश्री विखे यांनी भाजपच्या सर्व नेत्यांच्या सौभाग्यवतींना पुरणपोळी जेवणाची विशेष पंगत आयोजित केली होती. एकूणच विखेंचे दिल्ली दरबारी वाढत असलेले वजनाचे नकारात्मक प्रतिबिंब राज्यातील राजकारणात पडत आहेत का? यासाठी कोण, कुणाच्या माध्यमातून डाव साधत आहे, यावरही राजकीय वर्तुळात गुफ्तगू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com