Satara Political News : चार दिवसांपूर्वी सातारा जिल्हा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कराडच्या शिवाजी स्टेडियमवर आयपीएल - रणजी सामन्यावरून चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली होती. या टोलेबाजीमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्यात चैतन्याचे, हास्य - विनोदाचे वातावरण निर्माण झाले असताना शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदेंनी साताऱ्यातून गुगली टाकली आहे.
त्यांनी आयपीएल आणि 20 - 20 मॅचचे जनक शरद पवार असून तेच कोणाची विकेट घ्यायची आणि कोणाला टीममध्ये ठेवायचं ठरवत असल्याचे म्हटले आहे. आमदार शिंदे यांनी क्रिकेटचा संदर्भ देत अजून बरीच राजकीय उलथापलथ होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, या देशात आयपीएल आणि 20 - 20 मॅच कोणी आणली असेल तर ते शरद पवार आहेत.
त्यामुळे पवार साहेबच आयपीएलचे जनक आहेत. तेव्हा कोणता खेळाडू ठेवायचा, कोणाची विकेट घ्यायची आणि कोणता संघ खेळणार हे शरद पवारच ठरवतात. तेव्हा अजून बऱ्याच उलथापालथी होणार असल्याची राजकीय गुगली आमदार शशिकांत शिंदे यांनी टाकली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी धाडस दाखवले...
कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीस यांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी आहे. बाबरी मशीद पाडली, त्यावेळी कोणी जबाबदारी घेत नव्हते. परंतु, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धाडस दाखवले. शिवसेनेने घटनेची जबाबदारी घेतल्याचे व त्या शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे जाहीर केले. त्यावेळी कोणी धाडस करत नव्हते. आज मात्र सर्वजण याचे श्रेय घेत आहेत आहेत.
पंतप्रधानांची हीच का लोकप्रियता ?
मराठा आरक्षणाबाबत ज्या नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे, त्यांच्याबाबत गावबंदीचा निर्णय घेताना विचार करावा. अन्यथा सरसकट सर्वच नेत्यांबाबत चुकीचा संदेश जाईल. सरकारने समाजात तेढ वाढू नये, यासाठी प्रयत्न करावे आणि आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत मार्गी लावणार हे स्पष्ट करावे. मुंबईला आंदोलनकर्ते आले तर मुंबई आणि पर्यायाने देश ठप्प होईल.
देशाची निवडणूक लोकांनी हातात घेतली तर इतिहास घडेल. अन्यथा पुढील निवडणूक होईल हेही सांगता येणार नाही. भाजपाने इतर पक्षातील मातब्बर नेते घेतले तरीही ईडीच्या धाडी विरोधकांच्या घरी पडत आहेत. दोन दिवसात पाच ठिकाणी ईडीच्या धाडी पडल्या आहेत. पंतप्रधानांची हीच का लोकप्रियता असा सवाल आमदार शिंदे यांनी केला.
राम मंदिर राजकीय इव्हेंट होवू नये...
प्रभू श्रीराम कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व भारतीयांचे आहेत. तसा संदेश दिला गेला पाहिजे. मुस्लिम तरूणीही सायकलवरून गेली आहे. तेव्हा देवाला धर्मात वाटू नये. राजकीय विषय तसेच इव्हेंट होवू नये. अयोध्येचे मंदिर खूप वर्षांनंतर होत असून त्याचा आनंद आम्हा सर्वांनाच आहे.
देशात फतवा निघाला की अमंलबजावणी होते...
देशात एकादा फतवा निघाला की त्यांची अमंलबजावणी केली जाते. त्यामुळे कोणी ऐकून घेईल असे मला वाटत नाही. निवडणूक आयोगाने सांगण्याअगोदर केवळ चर्चा होत आहे. 'वन नेशन वन इलेक्शन'ला काँग्रेस पाठोपाठ आम आदमी पार्टीने विरोध केला आहे. त्यावर आमदार शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.