Rajan Patil : भाजपमध्ये प्रवेश करताच राजन पाटलांना पाठबळ देण्यासाठी फडणवीस मोहोळमध्ये येणार

Mohol Political News : माजी आमदार राजन पाटील, त्यांचे पुत्र आणि यशवंत माने यांनी मुंबईत भाजप प्रवेश केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मोहोळला येणार असल्याने राजन पाटील गटाला बळ मिळाले आहे.
Devendra Fadnavis-Rajan Patil
Devendra Fadnavis-Rajan PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, त्यांचे दोन्ही पुत्र आणि यशवंत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून समर्थकांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

  2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच मोहोळ दौऱ्यावर येऊन समर्थकांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत, ज्यातून पाटील यांना भाजपकडून राजकीय बळकटी दिली जात आहे.

  3. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या मोहोळमध्ये भाजपने मजबूत पाय रोवण्याची तयारी सुरु केली आहे.

Solapur, 31 October : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, त्यांचे दोन्ही पुत्र आणि यशवंत माने यांचा बुधवारी (ता. २९ ऑक्टोबर) मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे. या प्रवेशासाठी राजन पाटील समर्थकांनी तोबा गर्दी केली होती. त्या कार्यक्रमात माजी आमदार पाटील आणि त्यांचे दोन्ही पुत्र, प्रमुख संस्थांचे पदाधिकारी यांचा प्रवेश झाला. मात्र, समर्थकांचा भाजप प्रवेश लवकरच मोहोळमध्ये होणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोहोळमध्ये येणार आहेत, त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करताच राजन पाटलांना बळ देण्याचे धोरण फडणवीसांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

राजन पाटील समर्थकांच्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात येत्या मंगळवारी (ता. ०४ नोव्हेंबर) निश्चित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून भाजपने राजन पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात पक्षाला मोठ्या नुसानीचा समोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

माजी आमदार राजन पाटील यांच्यासह समर्थक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २९ ऑक्टोबर) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांचे समर्थक कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले जाणार आहे.

नव्याने पक्षात आलेल्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बुधवारी चहापानाचा कार्यक्रम होणार होता. मात्र, तो रद्द झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण देता आले नाही. त्यामुळे लवकरच त्यांना भेटून निमंत्रण देण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis-Rajan Patil
Satara Politic's : आमदार महेश शिंदे-शशिकांत शिंदेंसाठीच्या प्रतिष्ठेची लढतीतील विजयाची चावी गोरेंच्या हाती!

माजी आमदार राजन पाटील यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या महत्त्वाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी येत्या आठ-दहा दिवसांत तालुक्यात मेळावा घेण्याचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करणार आहोत. त्याबाबत येत्या मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर तारीख मिळेल. या मेळाव्यात आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असे माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत पाटील यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis-Rajan Patil
Sangli Politic's : सुधीर गाडगीळांनी ‘लेटरबॉम्ब’ टाकताच सुरेश खाडे चंद्रकांतदादांच्या मदतीला धावले; मात्र त्यांनी संभ्रमच वाढविला...

Q1. राजन पाटील यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
A1. राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

Q2. त्यांच्या समर्थकांचा भाजप प्रवेश कुठे होणार आहे?
A2. समर्थकांचा भाजप प्रवेश मोहोळमध्ये मेळाव्यात होणार आहे.

Q3. या मेळाव्याला कोण उपस्थित राहणार आहेत?
A3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Q4. या प्रवेशाचा मोहोळच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
A4. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोहोळमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com