Solapur Politics : जानकर, नारायणआबा अन् अभिजीत पाटील मोहिते पाटलांच्या निशाण्यावर : 'लाचारी पत्करू नका' म्हणत दिला इशारा

Dhairyasheel Mohite Patil takes aim Sharad Pawar faction MLAs over their reported proximity BJP during Pune teachers and graduates elections : पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत भाजपशी जवळीक साधल्याच्या चर्चेवरून खासदार आक्रमक; सोलापूरमधील राजकीय घडामोडींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Graduates Constituency Election 2026 : पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी भाजपशी घरोबा करून बसलेत.

यावरून राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच, पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदारांच्या या भूमिकेवर मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली. भर सभेत सुनावताना, तुम्ही दुसऱ्याच्या दारात जाऊन लाचारी पत्करू नका, अशा शब्दात धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्प्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाचे आमदार सत्ताधारी महायुतीबरोबर दिसत आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. ते मेळाव्यांना देखील उपस्थिती लावत आहेत.

आमदार उत्तम जानकर, शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांचा देखील भाजपला (BJP) पाठिंबा असल्याचा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे मागील काही दिवसांपासून भाजपशी जवळीक साधून आहेत.

Dhairyasheel Mohite Patil
Shivsena vs BJP : भाजप नेत्याची आमदारकी रद्द करण्यासाठी शिवसेनेतून लागली फिल्डिंग : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचे CM अन् राज्यपालांना पत्र

शरद पवारांकडून पाहून मतदान

पक्षाच्या आमदारांच्या या भूमिकेवरून, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी, संताप व्यक्त केला आहे. भर सभेत आमदारांचे कान टोचताना, लोकांनी शरद पवारांकडे पाहून मतदान केले आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या दारात जाऊन लाचारी पत्करू नका, अशा शेलक्या शब्दात टोला लगावला आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी थोरात-लंके एकत्र येईनात? राम शिंदेंच्या हालचालींनी वाढवली उत्सुकता

तिन्ही आमदारांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष

धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट तिन्ही-चारी आमदारांना सुनावल्याने, शरद पवार राष्ट्रवादी पक्षात नेमके काय चालले आहे, याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. धैर्यशील मोहिते पाटील, यांच्या या टोलेबाजीवर तिन्ही आमदारांकडून अजून तरी प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षात विधान परिषदेच्या निवडणुकीत नेत्यांच्या या संभाव्य फाटाफुटीचा थेट परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

शरद पवार लक्ष ठेवून

शरद पवार यांच्यापासून आमदारांच्या अन् खासदारांच्या हालचाली लपलेल्या नाहीत. निवडणुकीचा हा अंतिम टप्पा आहे. शरद पवार शेवटच्या टप्प्यात कोणती भूमिका घेतात, अन् आमदार त्याला कसा प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागले आहे. धैर्यशील मोहिते पाटील याबाबत पक्ष नेतृत्वाकडे या तिन्ही आमदारांची तक्रार करतात, हे देखील पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com