Madha Lok Sabha Result : बहादुरी दिखाने की चीज नही है, बहादूर तब बनो जब जरुरत हो ; मोहिते पाटलांनी लढून दाखवलं...

Loksabha Election 2024 : आमदार बबनराव शिंदे यांच्या माढ्यातून मोहिते पाटील यांना एक लाख २२ हजार ५७० मते, तर निंबाळकरांना ७० हजार ०५५ मते मिळाली आहेत. शिंदेंच्या माढ्यातून तब्बल ५२ हजार ५१५ मतांचे लीड मोहिते पाटील यांना मिळाले आहे.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama

Solapur, o4 June : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील हे तब्बल एक लाख २० हजार ८३७ मतांच्या फरकाने विजय मिळविला. त्यांना सहा लाख २२ हजार २१३ मते मिळाली आहेत, त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ५ लाख ०१ हजार ३७६ मते मिळाली आहेत. अडचणींचा मोठा डोंगर असतानाही मोहिते पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘बहादुरी दिखाने की चीज नही है, बहादूर तब बनो जब जरुरत हो...’ असे सिद्ध केले आहे.

माढा लोकसभा मतदासंघात धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी मोहिते पाटील हे माढ्यातून निवडणूक लढविण्याची जिद्द दाखवतील का, असा प्रश्न विचारला जात होता. कारण, साखर कारखाने, पतसंस्था आणि जिल्हा बॅंकेतील प्रकरणांची कुजबूज होत होती. त्यामुळे भाजपला आव्हान देण्याची भाषा मोहिते पाटील करणार नाहीत, असा अनेक राजकीय जाणकरांचा होरा होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटील यांनी ‘बहादुरी दिखाने चीज नही है’ असे म्हणत अखेर माढ्याच्या रिंंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदारकीचा अडथळा कुटुंबीयांकडे होता. त्यात सफाईदारपणे मार्ग काढत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून घरातील सर्व लहान थोर धैर्यशील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. विशेषतः तब्येत बरी नसतानाही विजयदादा आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील यांना बळ दिले.

धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यात ९७ हजार ४६९, तर निंबाळकरांना ५५ हजार ९५८ मते पडली आहेत. माजी आमदार नारायण पाटील यांनी एकट्याने किल्ला लढवत करमाळ्यातून ४१ हजार ५११ मतांचे लीड मोहिते पाटील यांना दिले आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्या माढ्यातून मोहिते पाटील यांना एक लाख २२ हजार ५७० मते, तर निंबाळकरांना ७० हजार ०५५ मते मिळाली आहेत. शिंदेंच्या माढ्यातून तब्बल ५२ हजार ५१५ मतांचे लीड मोहिते पाटील यांना मिळाले आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Solapur Lok Sabha Vishleshan : ‘फ्लाॅवर समझा क्या....फायर हूँ..’; प्रणिती शिंदेंनी निकालातून दाखवले!

सांगोल्यात ८४ हजार ५५६ मते मोहिते पाटील यांना, तर ८९ हजार ०३८ मते निंबाळकरांना मिळाली आहेत. येथून ४४८२ मतांचे लीड निंबाळकर यांना मिळाले आहे. माळशिसरमध्ये मोहिते पाटील यांना १ लाख ३४ हजार २७९ मते, तर निंबाळकरांना ६४ हजार १४५ मते मिळाली असून मोहिते पाटलांना ७० हजार १३४ मतांचे लीड मिळाले आहे.

फलटणमधून ९३ हजार ६३३ मते मोहिते पाटील यांना, तर निंबाळकरांना १ एक लाख १० हजार ५६१ मते मिळाली आहेत. या ठिकाणी निंबाळकरांना १६ हजार ९२८ मतांची किरकोळ आघाडी मिळाली आहे. माणमधून मोहिते पाटलांना ८६ हजार ०५९ मते मिळाली, तर निंबाळकरांना १ लाख ०९ हजार ४१४ मते पडली आहेत, इथूनही निंबाळकरांना २३ हजार ३५५ मतांचे लीड मिळाले आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Solapur Lok Sabha Result : प्रणिती शिंदेंनी रोखली भाजपची हॅट्‌ट्रीक; सातपुतेंचा 74 हजार मतांनी केला पराभव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com