Dhananjay Mahadik : मुलगा लग्नाच्या मांडवात अन् खासदार प्रचाराच्या मंडपात

Kolhapur Lok Sabha Election Latest Update : राज्य पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत अनेक दिग्गज प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. कधी नाही ते यंदा प्रथमच कोल्हापूर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची आणि तितकेच चर्चेची बनली आहे.
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama

Kolhapur Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडत आहे. अशातच उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने 'सुपर संडे' मानला जात आहे. राज्य पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत अनेक दिग्गज प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. कधी नाही ते यंदा प्रथमच कोल्हापूर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची आणि तितकेच चर्चेची बनली आहे. Loksabha Election Campaign

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) , नितीन गडकरी (Nitin Gadkari), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मॅरेथॉन दौरे सुरु आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेची रंगत अधिक चूरशीची बनली आहे.

Dhananjay Mahadik
Eknath Shinde : बालेकिल्ल्यात कमी पण लाडक्या कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे सतत दौरे; शिवसैनिकांमध्ये उर्जा...

लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरु असताना महायुतीचे नेते आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे द्वितीय चिरंजीव विश्वराज महाडिक यांच्या लग्नाची धांदल महाडिक कुटुंबात आहे. दोन दिवसावर लग्न कार्य येऊन ठेपले असताना खासदार महाडिक हे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. केंद्रीय पातळीवरून अनेक दिग्गज कोल्हापुरात ठाण मांडून असल्याने खासदार महाडिक ही या लग्नसराईत थांबण्याऐवजी मंत्र्यांच्या प्रचार दौऱ्यात आणि सभेत व्यक्त आहेत.

दरम्यान, आज साडेअकरा वाजता विश्वराज महाडिक यांचा साखरपुडा आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यात असल्याने त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महासैनिक दरबार हॉल येथे 'कॉफी विथ नितीन गडकरी' या कार्यक्रमाला महाडिक यांनी उपस्थिती लावली आहे. त्यांच्या या कृतीमुळे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

Dhananjay Mahadik
Omraje Nimbalkar News : 'पाच वर्ष तुमच्या हाकेला धावलो, आता हक्काने तुम्हाला हाक देतोय'; ओमराजेंची भावनिक साद...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com