Omraje Nimbalkar News : 'पाच वर्ष तुमच्या हाकेला धावलो, आता हक्काने तुम्हाला हाक देतोय'; ओमराजेंची भावनिक साद...

Latest Marathi News : महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यात इथे थेट लढत होत आहे.
Omraje Nimbalkar News
Omraje Nimbalkar NewsSarkarnama

Dharashiv News : माझी हाक, तुमची साथ, अशी साद लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर मतदारांना घालतांना दिसत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा उद्या, (ता. 5) रोजी सायंकाळी थंडावणार आहेत. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यात इथे थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असताना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांकडून मतदारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Omraje Nimbalkar News
Chandrahar Patil Wealth : चंद्रहार पाटलांकडे 47 लाखांची कार, संपत्ती किती?

मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क ही ओमराजे यांची ताकद असल्याचे बोलले जाते. अनेक जाहीर सभा आणि भाषणातून ओमराजे यांच्या या संपर्काचे कौतुक केले जाते. तर विरोधक यावरून त्यांची खिल्ली उडवतात. पण याच जनसंपर्काचा आणि त्या आधारे मतदारसंघातील नागरिकांना केलेल्या मदतीचा आठवण करून देत ओमराजे यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

Omraje Nimbalkar News
Shinde Will Join BJP? : सुशीलकुमार शिंदे भाजपत जाणार?; नाना पटोलेंनी दिले हे उत्तर...

खासदार म्हणून जे जे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे काम घेऊन आले ते मी सोडवण्याचा कायम प्रामाणिक प्रयत्न केला. 5 वर्षे तुम्ही हाक दिली आणि मी तुमच्या हाकेला धाऊन आलो, आता मी हक्काने तुम्हाला हाक देत आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या हाकेला साथ द्याल. कोणताही कंटाळा न करता, कोणत्याही कोपऱ्यात जरी राहत असाल तरी तुमच्या ओमराजेसाठी मतदानाला यावे, ही विनंती.

तुम्ही तर याच पण तुमचे नातेवाईक, मित्र, परिचित सगळ्यांना सांगा की ओमराजे नी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू आणि जोरात मतदान करू. कारण जनतेचा विश्वास आणि प्रेम याच ताकदीवर मी निवडणूक लढत आहे, अशी भावनिक साद ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी घातली आहे. राज्यात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ओमराजे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या हल्ल्याला परतवून लावले.

Omraje Nimbalkar News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

या निष्ठेच फळ त्यांना पक्षाने दुसऱ्यादा लोकभेची उमेदवारी देत दिले. आता प्रत्यक्ष परीक्षेची वेळ आल्यामुळे सगळेच उमेदवार कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , आदित्य ठाकरे यांनी धाराशिव मध्ये सभा घेतल्या. तर महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मराठवाड्यातील धाराशिवच्या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com