Kolhapur News : पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची पोलिस ग्राउंडवरील बुलेट सवारी राज्यात चर्चेचा विषय ठरली. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या बुलेट सवारीने महायुतीमधील नेत्यांचे मनोमिलन स्पष्ट झाले आहे. पण आता याच धनंजय महाडिकांची बुलेट सवारी थेट आमदार सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यात घुसली आहे. कसबा बावडा येथे गल्लीबोळात बुलेट सवारी करीत वातावरणनिर्मिती केली आहे. त्यांच्या या सवारीची कोल्हापुरात जोरदार चर्चा आहे.
मोटारसायकलबरोबर म्हैस व रेडकू पळवण्याच्या शर्यतीच्यानिमित्ताने राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा येथील कागलवाडी परिसरात केलेली बुलेट सवारी चर्चेचा विषय ठरली. खासदार महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त युवानेते कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून या स्पर्धा झाल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उलपे गल्ली, कागलवाडी परिसरातील महाडिकप्रेमींच्या वतीने महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यती झाल्या. झेंडा चौक ते जयभवानी गल्ली चौक या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला.
सायंकाळी धनंजय महाडिक यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बुलेटवर मागे बसून शर्यत मार्गावर सवारी करून उपस्थितांना दाद दिली. त्यांची ही बुलेट सवारी मात्र चर्चेचा विषय ठरली. ‘राजाराम’ कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, विजय उलपे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पोवार आदी यावेळी उपस्थित होते.
Edited By : Rashmi Mane
R...