Kolhapur Politics : 'विघ्नसंतोषी, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा कोल्हापूरच्या विकासाला विरोध', मुन्ना महाडिकांनी बंटी पाटलांवर तोफ डागली!

Dhananjay Mahadik Vs Satej Patil : कोल्हापूरच्या विकासकामांना काही विघ्नसंतोषी लोकांकडून विरोध केला जात असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. तसेच ओपन चॅलेंज देत विकासकामे करणारच असे देखील ठणकावले.
Dhananjay Mahadik Vs Satej Patil
Dhananjay Mahadik Vs Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Mahadik News : 'मला खंत वाटते कोल्हापूरच्या विकासासाठी काही विघ्नसंतोषी आणि दुष्ट प्रवृत्तीची लोक, काही खुनशी लोक आणि समूह कोल्हापूरच्या विकासासाठी अडथळा निर्माण करण्याचं काम करत आहेत.', अशी टीका राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडीच्या स्पर्धेच्या निमित्ताने सतेज पाटील यांचे नाव न घेता केली.

'विमानतळाच्या विस्तारीकरण करण्याला विरोध, हद्द वाढीला विरोध, शक्तीपीठ महामार्गाला विरोध,काही चांगले प्रकल्प कोल्हापुरात येत असतील तर त्याला जाणीवपूर्वक विरोध केला जातोय. आता कोणी ती विरोध केला तरी कोल्हापूरची हद्दवाढ, शक्तिपीठ महामार्ग होणारच', असे ठणकावून धनंजय महाडिक यांनी सांगितले.

'मी गेल्या वर्षी याच व्यासपीठावरून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि जिल्ह्यात दहा पैकी दहा जागा महायुतीच्या येणार असं म्हणालो होतो. जिल्ह्यात दहा जागा महायुतीच्या आल्या. माजी पालकमंत्री आणि विमानतळावरून माझ्यावर टीका केली. कोणीही कितीही विरोध करू दे कोल्हापूरची हद्दवाढ होणारच. कोणीही कितीही विरोध करू दे कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्ग होणारच. कितीही विरोध झाला तरी हे सगळे प्रकल्प आपण पूर्ण करणार आहोत.', असे देखील महाडिक म्हणाले.

Dhananjay Mahadik Vs Satej Patil
Manoj Jarange VS Devendra Fadnavis : 'फडणवीस शिदेंना काम करू देत नाही, हे सिद्ध झालं', मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

'भावांनो, हे कोल्हापूर आहे हे साधं सुद्धा नाही. 5000 करोडचा टर्नओव्हर असलेल्या प्राडाला सुद्धा कोल्हापूरमध्ये आणण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महादेवी हत्तीनीला वनतारामध्ये नेलं गेलं. मात्र तुमच्या प्रयत्नामुळे वनताराला नांदणीमध्ये येऊन एकरी हॅबिटेशन सेंटर सुरू करावा लागलं. हे सगळं आपल्या संघटि पणाचे यश आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

Dhananjay Mahadik Vs Satej Patil
Bhagwa Shawl Controversy : तळ कोकणात पुन्हा राणे विरुद्ध सामंत! 'काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून...' उदय सामंतांचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com