Dhananjay Mahadik on Satej Patil : धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा; म्हणाले..'डोनेशन अन् भ्रष्टाचाराच्या पैशाची..'

Dhananjay Mahadik News : दहीहंडीचा यंदाचा कार्यक्रम राजकीय टोलेबाजीने गाजला, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत महाडिक?
Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Satej Pati Vs Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीचा यंदाचा कार्यक्रम राजकीय टोलेबाजीने गाजला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर चांगलेच बरसले आहेत. त्यांच्यावर थेट टीका करत जिल्ह्यातील माजी पालकमंत्र्यांना डोनेशन मधून मिळालेल्या पैशाची आणि भ्रष्टाचारातील कमावलेल्या पैशाची मस्ती आली आहे. अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी टीका केली आहे. दसरा चौक येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापुरात अनेक विकास कामे सुरू आहेत. या विकास कामाचा दाखला देत असताना सभेचे खासदार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. कोल्हापुराच्या माजी पालकमंत्र्याला कावीळ झाल्यासारखं सगळं जग पिवळं दिसतंय.

कोल्हापूर करांनी त्यांना भरभरून दिले आहे. लहान वयात आमदार केलं, त्यांना मंत्रीपद दिलं, कोल्हापुरच्या जनतेने सर्व सत्ता ताब्यात दिलं. सहा आमदार त्यांचे आहेत दोन विधानसभा, आणि दोन विधानपरिषद त्यांच्याकडे आहेत. त्यांनी कोल्हापूरकरासाठी काय केलं हे सांगावे? काम केले असतील तर दहीहंडीचे तीन लाख त्यांना बक्षीस देतो. असे महाडिक यांनी जाहीर केले.

Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Prithviraj Chavan News : '...तो महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्काच' ; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप!

श्री रामाचा वनवास चौदा वर्षात संपला, पण थेट पाईपलाईनचा वनवास अजून संपला नाही. सत्तेच्या माध्यमातून नेहमीच कोल्हापूरकरांच्यावर माजी पालकमंत्र्यांनी अन्याय केला आहे. कोल्हापूर अविकसित ठेवण्याचे काम त्यांनी सातत्याने केला आहे.

डोनेशनच्या पैशाने आणि भ्रष्टाचार याने मिळवलेल्या पैशाची त्यांना मस्ती आली आहे. या मस्तीच्या माध्यमातून सर्व सत्ता त्यांनी ताब्यात घेतली आहे. या सत्तेचा गैरवापर करण्याचं काम माजी पालकमंत्री करत आहेत. असा घणाघात महाडिक यांनी सतेज पाटील(Satej Patil) यांच्यावर केला.

तसेच या शहराला अनेक स्वप्न त्यांनी दाखवली. आयटी पार्क आणण्याचे स्वप्न त्यांनी दाखवलं मात्र अनेक वर्षापासून ते आलं नाही. महापालिका पंधरा वर्षे त्यांच्याकडे आहे पण शहरातील एक रस्ता चांगला नाही. कोल्हापूर शहरातील कचऱ्याची अवस्था बिकट आहे. पंधरा वर्षे त्यांनी एक ही प्रश्न सोडवलेला नाही.

अलीकडे त्यांचे वेगळंच सुरू झाला आहे, सकाळी उठलं की हिंदुद्वेषी वक्तव्य करायचं. कोल्हापुरात दंगली होणार आहे म्हणायचं आणि त्यांचं वक्तव्य खरं ठरत आहे. दोन ते तीन वेळा दंगली झाल्या आहेत, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. असा टोला महाडिक यांनी लगावला.

Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Kolhapur Politics : राधानगरीत का निर्माण झाला आहे भाजपविरोधात रोष?

गोकुळ त्यांच्या ताब्यात आहे.गोकुळ मध्ये वेटनरी कॉलेज करण्याचा मानस आहे. ते करण्यास विरोध नाही पण खासगी करण्यास विरोध आहे. खासगी म्हणजे डी वाय पाटीललाच हे जाणार आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. पालकमंत्री तुम्ही हे होऊ देऊ नका. राजकारणाचा धंदा करणाऱ्या या चेहऱ्याला कोल्हापूरकरांनी ओळखलं पाहिजे. असेही महाडिक म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com