Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांकडून कृष्णराज महाडिकांचं कौतुक

Krishnaraj Mahadik controversy : कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे धनंजय महाडिक युवाशक्ती यांच्या वतीने दहीहंडी यां कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी यां कार्यक्रमात खासदार महाडिक काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदाही त्यांचे एका वाक्याने हे भाषण पुन्हा एकदा चर्चेत आले.
Dhananjay Mahadik addressing the Dahi Handi event in Kolhapur, where his remark about Krishnaraj Mahadik sparked political controversy.
Dhananjay Mahadik addressing the Dahi Handi event in Kolhapur, where his remark about Krishnaraj Mahadik sparked political controversy.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

खKolhapur News, 06 Sep : मनसेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि मनसेमध्ये वाक्ययुद्ध सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही कृष्णराज महाडिक यांना सल्ला दिला आहे. दोन्ही गटांमधील हा वाद चर्चेत असतानाच कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मुलाचे तोंडभरुन कौतुक केले.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या जनतेने महाडिक कुटुंबाला भरभरून दिल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याचे सांगताना त्यांच्या पदाचा उल्लेख केला.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतकी मोठी जबाबदारी कृष्णराज महाडिकवर सोपवली आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली,” असे धनंजय महाडिक म्हणाले. कृष्णराज महाडिक हे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.

Dhananjay Mahadik addressing the Dahi Handi event in Kolhapur, where his remark about Krishnaraj Mahadik sparked political controversy.
Gulabrao Patil News: 'भाजपवाले जसे पक्ष फोडतात, तसे तुम्ही विद्यार्थ्यांना फोडा..'; सरकारमधील मंत्र्याचं शिक्षक दिनाच्या कार्यक्रमातच मोठं विधान

गोकुळ निवडणुकीचेही रणशिंग

याच कार्यक्रमातून धनंजय महाडिक यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबतही भूमिका मांडली. महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाणार असून ‘२५-०’ असा निकाल लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com