शिवसैनिकांनी हिसका दाखवताच सोलापूर बस स्थानकात शिवराज्याभिषेकदिन साजरा झाला!

अखेर घडलेल्या प्रकाराबद्दल आगारप्रमुखांनी माफी मागितली आणि त्यानंतर बसस्थानकात शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
Shiv Rajyabhishek Day
Shiv Rajyabhishek DaySarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) बस स्थानकात शिवराज्याभिषेक दिन साजरा न करण्यात आल्याने शिवसैनिकांनी (Shiv Sena) संताप व्यक्त करत राडा घातला. संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांचे काम बंद पाडले. अखेर घडलेल्या प्रकाराबद्दल आगारप्रमुखांनी माफी मागितली आणि त्यानंतर बसस्थानकात शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. (Shiv Sainiks express outrage over non-celebration of Shiv Rajyabhishek Day at Solapur bus stand)

संपूर्ण राज्यात सहा जून हा शिवराज्यभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. पण, सोलापूर बस स्थानकात शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे शिवसैनिकांनी बस स्थानकात जाऊन राडा घातला. कर्मचाऱ्यांनी शिवराज्याभिषेक साजरा न केल्यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. बसस्थानकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर धूळ साचली होती. त्यामुळे शिवसैनिक आणखीनच चिडले. संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांचं काम बंद पाडलं.

Shiv Rajyabhishek Day
आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षाला बेदम मारहाण

दरम्यान, या प्रकाराबद्दल सोलापूरचे आगार प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांनी धारेवर धरलं होतं. शिवसैनिकांचा संताप पाहून बस स्थानकाच्या आगार प्रमुखाने अखेर माफी मागितली. त्यानंतर बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची साफसफाई करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवसैनिकांनी हिसका दाखवताच बस स्थानकात 'शिवराज्याभिषेक दिन' साजरा करण्यात आला.

Shiv Rajyabhishek Day
भाजपच्या महाडिकानंतर शिवसेना नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला!

याबाबत शिवसेनचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रेय वानकर म्हणाले की, संपूर्ण राज्यात आज शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. आम्ही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा दिन साजरा करण्यात आला. या चौकालगतच असलेल्या बस स्थानकात महाराजांचा अवमान झाल्यासारखी परिस्थिती आम्हाला दिसली. बस स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर अर्धा इंचाची धूळ होती. फोटोला हारसुद्धा घालण्यात आलेला नव्हता. शिवाजी महाराजांचा आदर जर या बसस्थानकाला ठेवता येत नसेल तर अनादरही त्यांनी करू नये. या घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही शिवसेनेच्या वतीने डेपोचा निषेध नोंदविला असून त्यांना समजही देण्यात आलेली आहे. शेवटी आगार प्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली. यापुढे असा प्रकार घडला तोडफोड करत शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही वानकर यांनी या वेळी बोलताना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com