Dhananjay Mahadik: भाजप खासदारानं 'लाडक्या बहिणीं'नाच भरला दम; 'जी बहीण काँग्रेसच्या सभेत अन् रॅलीत दिसेल...'

Kolhapur Politics : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक हे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू आहेत. प्रचारार्थ त्यांनी फुलेवाडी येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेत अध्यक्ष भाषणात बोलत असताना धनंजय महाडिक यांनी हे वक्तव्य केले आहे.
DhananjaY Mahadik Ladki Bahin Yojana .jpg
DhananjaY Mahadik Ladki Bahin Yojana .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड जोर लावला आहे.महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशातच नेतेमंडळीच्या वादग्रस्त विधानांनी युती आणि आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे. यातच आता भाजप खासदारानं चक्क 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेवरुन महिलांना जाहीर सभेत स्टेजवरुन दम भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कोल्हापुरात लाडक्या बहिणींना भाजप खासदारांनी दम देण्याचा प्रकार घडला आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी खुल्या व्यासपीठावर भरसभेत लाडक्या बहिणींना दम दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी याबाबत ट्विट केले असून धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरुन तीव्र पडसाद उमटत आहेत.

भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी एका सभेत बोलताना काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत जी बहीण दिसेल, त्यांचे फोटो काढा. त्यांचे फोटो आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो, अशा शब्दांत लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) एकप्रकारे दमच भरल्याने विरोधकांंसह सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

DhananjaY Mahadik Ladki Bahin Yojana .jpg
Devendra Fadnavis: मराठवाड्यात 'जरांगे फॅक्टर'चा फटका रोखण्यासाठी फडणवीसांची मोठी खेळी? 'या' मराठा नेत्याची घेतली भेट

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक हे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू आहेत. प्रचारार्थ त्यांनी फुलेवाडी येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेत अध्यक्ष भाषणात बोलत असताना धनंजय महाडिक यांनी हे वक्तव्य केले आहे.

धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले..?

धनंजय महाडिक यांची प्रचारार्थ सभा झाली. या सभेत ते म्हणाले, ठिकाणी काँग्रेसची रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला पंधराशे रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही. अनेक ताई आहेत ज्या छात्या बडवून सांगत आहेत की, आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय ? असा सवालही त्यांनी केला.

DhananjaY Mahadik Ladki Bahin Yojana .jpg
Sujay Vikhe : 'शिजायला लागलं की, पातेल्याला लाथ.., लोकसभेपासून ग्रहमान काही ठीक नाही'; सुजय विखे यांचे विधान

ज्यांंना या योजनेचे पैसे नकोत,त्यांना म्हणायचं या फॉर्मवर सही कर, उद्यापासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद असंही धनंजय महाडिक यांनी महिलांना म्हटलं आहे.त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटू लागले आहे.यामुळे विरोधकांना महायुती सरकारवर टीकेची आयती संधीच मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com