Dhananjay Mahadik : महायुतीच्या नेत्यांचे कान टोचत धनंजय महाडिकांचं संभाजीराजेंना प्रत्युत्तर, म्हणाले...

Dhananjay Mahadik and Sambhaji Raje Chhatrapati : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण आणि काय म्हणाले आहेत.
Dhananjay Mahadik and Sambhaji Raje Chhatrapati
Dhananjay Mahadik and Sambhaji Raje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह देशभरातील विविध राज्यांमधील एकूण 195 उमेदवारांची यादी जाहीर केली गेली आहे. मात्र, पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसल्याने त्याबाबत महाविकास आघाडीकडून टीका सुरू आहे.

महाराष्ट्रातील महायुतीची यादी कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) यांनी महायुतीतील उमेदवारांच्या यादीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

'कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या तरी दोन्हीही जागा शिंदे गटाकडे आहेत. उमेदवार बदलाच्या चर्चा असल्यातरी त्याबाबतीत अजून कोणतीही चर्चा झाली नाही. 10 किंवा 11 मार्चला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे राज्यातील उमेदवार घोषित होतील. त्यांना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ताकदीने प्रयत्न करतील,' अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Mahadik and Sambhaji Raje Chhatrapati
Sambhajiraje Chattrapti News: वडील माझ्यासाठी सर्वस्व; 'या' कारणासाठी संभाजी राजेंची लोकसभा रिंगणातून माघार

माजी खासदार संभाजीराजे(Sambhaji Raje Chhatrapati) यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर, महाडिक यांनी संभाजीराजे यांची लोकसभेतून माघार म्हणजे आश्चर्यकारक आहे. गेली अनेक वर्षे ते स्वराज्य पक्षाकडून निवडणुकीची तयारी करत होते. ते लोकसभा निवडणूक लढवणार हे संभाजीराजे आणि त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक निर्णय असू शकेल, अशी प्रतिक्रिया दिली.

महायुतीमधून काही नेते शाहू महाराज छत्रपती यांच्या वयासंदर्भात टिप्पणी करत आहेत. त्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी चांगलेच सुनावले आहे. महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्यांना उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचे वय काय? असा सवाल केला होता. त्यावर महाडिक यांनीदेखील संभाजीराजे यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिले आहे.

Dhananjay Mahadik and Sambhaji Raje Chhatrapati
Satara Lok Sabha Election: मोठी घडामोड! सातारा लोकसभेचा आजच फैसला? पवारांनी मुंबईहून पाठवले हेलिकाॅप्टर अन्...

पंतप्रधान मोदींचे वय काय आणि त्यांचे कार्य काय? हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते अविरतपणे एकही दिवस सुट्टी न घेता काम करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याच नव्हे तर कोणाच्याच वयाबद्दल बोलू नये. मोदींच्या वयाबद्दल बोलू नये ते सर्वांपेक्षा कार्यक्षम आहेत, अशा शब्दांत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संभाजीराजे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com