Kolhapur Politics : 'महाडिकांचं पाप' अन् 'पाटलांचं पोटशूळ' ; मंजूर कामाच्या स्थगितीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी..

Satej Patil Vs Dhananjay Mahadik : "ढपला पाडता आला नाही, हे त्यांचे खरे दुःखं आणि मळमळ आहे. "
Kolhapur Politics :
Kolhapur Politics :Sarkarnama

Kolhapur News : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापुरातील सर्व कामांना स्थगिती मिळाली. मंजूर कामांना स्थगिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिंदे- फडणवीस सरकारला धारेवर धरले. कोल्हापूर जिल्ह्यात यावरून आजही आरोप-प्रत्यारोप होत आहे. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी 10 कोटी रुपयांचे इनडोअर स्टेडियम मंजूर केले होते. त्या कामाला आता स्थगिती मिळाल्याने त्यांनी थेट राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तोफ डागली आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Politics :
Kolhapur Politics : एकमेकांविरोधात दंड थोपटणारे पक्के राजकीय वैरी एकाच मंचावर; कोल्हापूर पॅटर्नची चर्चा..

कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच दहा कोटी रुपयांचे इनडोअर स्टेडियम मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर दुसऱ्या दिवशी निघणार होती. मात्र खासदार धनंजय महाडिक यांनी हे काम रद्द केले. त्यांनी हे काम का रद्द केले? 'याचा खुलासा त्यांनी करणे अपेक्षित होते. हे काम रद्द करणे हे पाप आहे. त्यांनी खेळाडूंच्यावर अन्याय केला आहे,' असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव घेताच केला.

आमदार सतेज पाटील यांच्या आरोपांना खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'साप साप म्हणून भुई थोपटण्यात सतेज पाटील वाकबगार आहेत. पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता आला नाही, हे त्यांचे खरे दुःख आणि मळमळ आहे. त्याचेच पोटशूळ त्यांना उठले आहे,' अशी टीका महाडिक यांनी केली आहे.

Kolhapur Politics :
Jitendra Awhad On Dilip Walse Patil : शरद पवारांचा अत्यंत विश्वासू माणूस कृतघ्न निघाला; वळसे पाटलांवर जितेंद्र आव्हाड कडाडले

राज्यात कोणतेही सरकार असले तरी जिल्ह्यातील राजकारण पाटील-महाडिक गटाभोवती फिरते. पाटील-महाडिक हे दोघेही आपापल्या परीने कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांना मार्गी लावले. दोघांनी यापूर्वीही एकमेकांवर कठोर टीका केली आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचं नाव घेऊन थेट आरोप केला आहे.

खरंतर कोल्हापूर शहर व जिल्ह्याची क्रिडानगरी म्हणून ओळख आहे. खेळाडूंनी कष्टाने हे नाव मिळवून दिले आहे. मात्र खेळाडूंसाठी होत असलेल्या इनडोअर स्टेडियम रद्द व्हावा, हा निर्णय खेळाडूंच्या दृष्टीने त्यांना दोन पावले मागे नेणारा आहे. एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यात ऊर्जा खर्च करण्यापेक्षा, त्या कामाला मंजुरी देत खेळाडूंना बळ देण्याची गरज आहे, असे सतेज पाटील म्हणाले.

Kolhapur Politics :
Shishir Dharkar In Shivsena UBT : पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेले शिशिर धारकर ठाकरेंच्या सेनेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com