
Satara, 04 February : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता, व्यक्ती वाल्मीक कराड याच्यावर जेव्हा आरोप झाले. तेव्हा मंत्री मुंडे यांनी नैतिकता दाखवून मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढे निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण, नैतिकता दाखवायला धाडस लागतं, ते धाडस आजच्या नेत्यामध्ये नाही, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर जोरदार प्रहार केला.
सातारा येथील कार्यक्रमात बोलताना आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे राजीनामा देतील, अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र करीत आहे. भ्रष्टाचार कसा झाला, तसेच देशमुख कुटुंबीयांच्या बाबत जी घटना घडली. त्याच्यात नेत्याचा आणि मंत्र्यांचा हात होता? नव्हता? हा वेगळा विषय आहे. पण नैतिकता दाखवण्याची गरज आहे.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा असंच हिंदीतून बोलत असताना त्यांच्याकडून एक छोटीशी चूक झाली होती. त्या वेळी नैतिकता म्हणून आर. आर. आबांनी राजीनामा दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुखांनीही राजीनामा दिला होता. एका प्रकरणात आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा दिला होता, अशी आठवणही रोहित पवार (Rohit Pawar) यांनी करून दिली.
बीडच्या जिल्हा नियोजन समितीने गेल्या दोन वर्षांत मंजुरी दिलेल्या कामाची चौकशी होणार आहे. त्या काळात धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते, यावर रोहित पवार म्हणाले, गेल्या पाच वर्षांत बीडमध्ये खरंच कामं झाली आहेत का? का कामं न करता बिलं निघाली आहेत? नाही तर या गावापासून त्या गावापर्यंत रस्ता दाखवला जातो, त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर होतात. पुन्हा त्या गावापासून या गावापर्यंत पाच कोटी रुपये मंजूर होतात. दोन कोटी रुपये खर्च केले जातात आणि तब्बल आठ कोटी रुपये त्या कामातून बाहेर काढले जातात. असे बऱ्याच ठिकाणी झालेले आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार म्हणाले, बीडमधील कामे ठराविक ठेकेदारालाच मिळाली आहेत काय, हेही पाहावे लागणार आहे. त्या ठेकेदाराच्या मागचा कर्णधार कोण? त्याचे नाव कराडच निघणार आहे. त्या व्यक्तीचेही नाव पुढं आलं पाहिजे. बीडमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सरकारकडून जी चौकशी सुरू आहे, त्यात काही निघेल असं वाटत नाही.
न्यायालयीन चौकशीवरच आपल्याला विश्वास ठेवता येईल. एसआयटी लावली, पण त्यातून आजपर्यंत काहीही निघालेलं नाही. राजकीय दृष्टीकोनातून या सर्व गोष्टी केल्या जातात. निष्कलंक निवृत्त अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र, तेवढं धाडस सरकार दाखवेल, असं मला वाटत नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.