Solapur : आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे, असून त्यापाठोपाठ आता धनगर समाजानेही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. धनगर समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी आज (शुक्रवार) धनगर आरक्षण कृती समिती आक्रमक भूमिका घेत भाजपचे नेते, सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला.
सोलापूर शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला. या प्रकरणी धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत.
आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे काही सदस्य त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी विखे पाटलांनी निवेदन दिले.
शंकर बंगाळे यांनी अचानक विखेंच्या डोक्यावर भंडारा उधळला. विखेंच्या सुरक्षारक्षकांनी बंगाळेंना चोप दिला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धनगर आरक्षण कृती समितीने केला आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.