Republican Sena News : रिपब्लिकन सेना नेत्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न ; पोलिसांकडून दलितांवर अन्याय..

Vidarbha News : सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Pune Police
Pune Police Sarkarnama

Buldhana : दलित समाजातील व्यक्तींवर अन्याय करत असल्याचा आरोप करीत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Pune Police
Supriya Sule News : लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर निर्णय घ्या ; सुप्रिया सुळेंची सरकारला सूचना

सिंदखेडराजा तालुक्यातील भानखेड येथे नागपंचमीच्या दिवशी पत्ते खेळण्याचा कारणावरून दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून दलित समाजातील व्यक्तींवर अन्याय करत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी दिलीप खरात यांनी केला होता. त्यानंतर दिलीप खरात यांनी सायंकाळी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Police
Mamata Banerjee News : आमदारांच्या पगारात भरघोस वाढ ; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

खरात यांनी सिंदखेडराजा पोलीस ठाण्याच्या आवारातच आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना तात्काळ सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून जालना येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

या सर्व घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी दिलीप खरात यांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद घेतली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com