Dhangar Reservation : धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा; अन्यथा मुंबईकडे जाणारे रस्ते बंद करू : पडळकरांचा इशारा

Ganesh Kesarkar धनगर आरक्षणासाठी व उपोषणकर्ते गणेश केसकर यांना पाठिंब्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
Dhangar Andolan
Dhangar Andolansarkarnama
Published on
Updated on

Dhangar Reservation Andolan : धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी लोणंद येथे गेली १६ दिवस उपोषणास बसलेले गणेश केसकर यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज ( ता. १) हजारोंच्या संख्येने महिला व नागरिक मेंढ्या, घोड्यांसह पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पारगाव खंडाळा येथे येऊन खंबाटकी घाट आडवत तब्बल साडेचार तास रास्तो रोको आंदोलन केले. दरम्यान, शासनाने धनगर समाजाचा अंत पाहू नये, लवकरात लवकर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा मुंबईकडे जाणारे सर्व रस्ते बंद करू, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

खंबाटकी घाटात आज धनगर समाजाने आरक्षण Dhangar Reservation मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. सकाळी अकरा वाजता शिवाजी चौक ते महामार्गापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर महामार्ग रोखण्यात Highway Blocked आला. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय आहे, तर शेळी, मेंढी घेऊन धनगर समाज महामार्गावर आला आहे.

त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद आहे. पुणे व सातारा बाजूस लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दोन्ही बाजूकडील रस्ते रोखून धरले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सरकारने तत्काळ धनगर आरक्षण देण्याचा निर्णय द्यावा, अशी मागणी केली.

गणेश केसकर यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

एकनाथ शिंदे यांची दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे गणेश केसकर यांनी स्वतः अंदोलकांना फोनवरून ध्वनिक्षेपाद्वारे सांगितल्यावर आंदोलकांनी साडेपाच वाजता तब्बल साडेचार तासांनी रास्ता रोकाे आंदोलन मागे घेतले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com