Khandala Dhangar Andolan: आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; खंडाळ्यात 'रास्ता रोको', महामार्गावर केले गजीनृत्य

Dhangar community अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाजाने पारगाव-खंडाळा येथे आंदोलन केले.
Dhangar Community Andolan
Dhangar Community Andolansarkarnama
Published on
Updated on

-अश्पाक पटेल

Khandala Rasta Roko: अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज पुणे-बंगळुरू महामार्गावर पारगाव - खंडाळा येथे आज रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी समाजाने घोषणाबाजी करत महामार्गावरच गजीनृत्य सादर केले. या प्रसंगी शेळ्या, मेंढ्या व घोडी घेऊन हा समाज रस्त्यावर उतरला होता. परिणामी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. डीवायएसपी धस यांनी लक्ष घालून आंदोलकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरू झाली.

पारगाव खंडाळा Khandala येथे सकल धनगर समाज Dhangar Community तहसील कार्यालय येथे एकत्र आला. त्यानंतर कै. यशवंतराव चव्हाण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन करून मोर्चा महामार्गावर पोचला. आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मारल्याने पुणे व सातारा दोन्ही बाजूंकडील वाहतूक विस्कळीत झाली.

या वेळी घोषणाबाजी करत महामार्गावरच गजीनृत्य सादर केले. शेळ्या, मेंढ्या व घोडी घेऊन हा समाज रस्त्यावर उतरला होता. पोलिसांनी सातारा बाजूकडील वाहने पंढरपूर फाटा शिरवळकडे, तर पुण्याकडे जाणारी वाहने वेळे (ता . वाई) येथे अडविण्यात आली. या वेळी सातारा बाजूला जाणारी वाहने चालकांनी लोणंद बाजूकडून वळविल्याने आंदोलक आक्रमक झाले.

Dhangar Community Andolan
Satara News : शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात आणणार : शिवेंद्रराजे

त्यांनी तीव्र भावना व्यक्त करून महामार्गावरून न हटण्याचा निर्णय घेतला. यानंतर पोलिस आणि आंदोलकात बाचाबाची झाली. डीवायएसपी धस यांनी यामध्ये लक्ष घालून आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर पुण्याकडील वाहतूक सुरू झाली.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com