Dhangar Reservation : आरक्षणासाठी धनगरांचा खंबाटकी घाटात 'रास्ता रोको' ; चौंडीतून राज्य सरकारला थेट इशारा

Choundi Reservation News : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीने आता राज्यभर जोर धरला आहे.
Choundi
Choundi Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Politics : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीने आता राज्यभर जोर धरला आहे. नगर जिल्ह्यातील चौंडी इथे गेल्या तेरा दिवसांपासून धनगर बांधव आमरण उपोषण करत असून, त्यातील दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सलाइनद्वारे उपचार सुरू आहेत. अशात काल (17 सप्टेंबर) चौंडी येथे राज्यभरातील धनगर समाजाचे नेते एकवटून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.

यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली चौंडीत उपोषण आंदोलन सुरू आहे. रविवारी झालेल्या राज्यस्तरीय समाजाच्या बैठकीस आमदार राम शिंदे, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामहरी उपनवर यांच्यासह यशवंत सेनेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब दांगडे यांच्यासह धनगर समाजबांधव राज्यभरातून उपस्थित होते.

Choundi
Saroj Ahire News : शरद पवार यांच्या संकेताने सरोज अहिरेंची झोप उडणार?

दोन दिवसांपूर्वीच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नगर आणि चौंडी येथे भेटी देत तब्येत बिघडलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेत येत्या दोन दिवसांत राज्य सरकार धनगर आरक्षणावर निर्णय घेईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, फडणवीस यांचे बाहेरगावी असलेले कार्यक्रम, गणेश चतुर्थी आदींमुळे बैठक दोन दिवसांत होणार नसल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर चौंडीत झालेल्या राज्यातील धनगर समाजाच्या नेत्यांनी आंदोलन तीव्र करण्याचे ठरवले असून, त्याचाच एक भाग म्हणून येत्या बुधवारी (20 सप्टेंबर) सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात भव्य 'रास्ता रोको' करण्याचा इशारा दिला. त्याचप्रमाणे राज्यभर समाजाच्या वतीने ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Choundi
Pune BJP Executive : जुन्या नव्यांचा धीरज घाटेंनी घातला मेळ; ५० जणांची निवड करत बांधली मोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com