
राहुल गांधींवर ईव्हीएम मुद्द्यावर टीका – मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की निकाल अनुकूल असतील तेव्हा ईव्हीएम चांगली आणि विरोधात लागल्यास वाईट असे म्हणणे योग्य नाही; राहुल गांधींनी पुरावे असतील तर सुप्रीम कोर्टात जावे.
सोलापूर विद्यापीठाचा पदवीदान समारंभ – पाटील यांनी मुलींचे यश पाहून कौतुक केले आणि पुरुष अधिक निवांत होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला.
प्राध्यापक भरतीवर माहिती – राज्यातील 700 प्राध्यापक भरतीला मंजुरी मिळाली असून विद्यापीठांना गरजेनुसार स्वनिधीतून किंवा CSR निधीच्या साहाय्याने कॉन्ट्रॅक्टवर प्राध्यापक नेमण्याचा सल्ला दिला.
Solapur, 18 September : लोकसभेला तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात चांगल्या जागा मिळाल्या मग तिथे तुम्ही मत चोरी केली का? जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं. जेव्हा निकाल तुमच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएम वाईट. हे न कळण्याइतकं माणसं वेडी राहिली नाहीत. राहुल गांधींनी आता सुप्रीम कोर्टात जावं, उगीच मीडियाची स्पेस खाऊ नये, असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लगावला.
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मतचोरीच्या मुद्यावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावले.
चंद्रकांत पाटील (Chandrakant patil ) म्हणाले, राहुल गांधी यांना आता काही कामंधंदा राहिलेला नाही. त्यांना रोज काहीतरी बोलायला पाहिजे. कारण ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. काँग्रेसचा चेहरा आहेत. ते सरळ बोलले की तुम्ही छापणार नाही आणि दाखवणार नाही. कारण, इतक्या वेळा त्यांनी मांडणी करूनही ते एकही गोष्ट प्रूव्ह करू शकले नाहीत.
राहुल गांधींनी आता सुप्रीम कोर्टात जावं. निवडणूक आयोगाने त्यांच्या पुराव्याची दखल घेतली नसेल. त्यांना सुप्रीम कोर्टात जाता येते. त्या ठिकाणीही दखल घेतली नाही तर पुन्हा डिव्हीजनमध्ये जाता येते. त्यामुळे त्यांनी कोर्टात जावे. रोज उठून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस खाऊ नका, असा सल्लाही चंद्रकांतदादांनी राहुल गांधींना दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापूर विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पार पडला, यामध्ये मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अहिल्यादेवी यांचे नाव विद्यापीठाला असल्याने कदाचित मुलींनी जास्त कर्तृत्व दाखवलं, असे मी म्हणालो. पण मी ही चिंताही व्यक्त केली की पुरुषांना नेमकं काय झालं? ते थोडे निवांत झालेत का? जवळपास 700 प्राध्यापकांची भरती प्रक्रिया प्रश्न होता ते देखील सुरळीत होईल.
प्राध्यापक भरतीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील 700 प्राध्यापक भरतीचा विषय तांत्रिक कारणामुळे पेंडिंग होता. पण आता ही भरती भरणार आहे, सुमारे 100 statutory पोस्ट भरायच्या राहिल्या होत्या, त्याही भरल्या जातील. साडेपाच हजार प्राध्यापक भरतीला देखील अर्थ खात्याने मंजुरी दिली आहे, ती ही प्रक्रिया होईल. तरीही आणखी 20 टक्के भरती गरजेची आहे, त्यासाठी विद्यापीठ स्वनिधीतून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने प्राध्यापक घेतात.
विद्यापीठाने 200 प्राध्यापक घेतलं आणि आणखी 100 लागणार असतील तर ते घ्या, आम्ही सामाजिक उत्तरदायित्व निधी सीएसआर निधी मिळवून देऊ, असा प्रस्ताव मी ठेवला आहे. याचा अर्थ सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढतंय, असा नाही. विद्यापीठ जर स्वनिधीतून कॉन्टॅक्टवर प्राध्यापक घेत असेल जर त्याला CSR जोडला तर स्वनिधी मोठा होईल. यामध्ये माझं काय चुकलं? एक प्राध्यापक माझ्यावर खूप लिहितायत, त्यांना म्हणा तुम्ही खिशातून कधी एक पैसा तरी दिलात का? व्यवस्थापन बदनाम करणे चुकीचे आहे, हे बरोबर नाही, असे मंत्री पाटील म्हणाले.
प्र.1: चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींना काय सल्ला दिला?
उ. – ईव्हीएम संदर्भात शंका असल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
प्र.2: विद्यापीठ समारंभात पाटील यांनी कोणता मुद्दा मांडला?
उ. – मुलींच्या अधिक यशामुळे पुरुष निवांत तर झाले नाहीत ना, असा प्रश्न विचारला.
प्र.3: राज्यात किती प्राध्यापक भरतीला मंजुरी मिळाली आहे?
उ. – सुमारे 700 प्राध्यापक पदांसह 100 statutory पोस्ट भरतीला मंजुरी मिळाली.
प्र.4: CSR निधीबाबत त्यांनी काय सुचवले?
उ. – विद्यापीठांनी स्वनिधी आणि CSR निधी एकत्र वापरून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने प्राध्यापक नेमावेत, असा सल्ला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.