Anurag Thakur: जेव्हा देशाला गरज असते तेव्हा राहुल गांधी दांड्या मारतात! अनुराग ठाकूर यांची टीका

Anurag Thakur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित सायकल फेरी कार्यक्रमाला अनुराग ठाकूर उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Anurag Thakur, Rahul Gandhi
Anurag Thakur, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Anurag Thakur: राहुल गांधी विरोधी पक्षनेते असूनही ते संसदेच्या अधिवेशनात अनुपस्थित असतात. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला ते नसतात. उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यालाही त्यांनी दांडी मारली. जेव्हा देशाला त्यांची गरज असते, तेव्हा ते तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात," अशी टीका भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित सायकल फेरी कार्यक्रमाला अनुराग ठाकूर उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Anurag Thakur, Rahul Gandhi
हिंसाग्रस्त मणिपूरसाठी PM मोदींनी केल्या 5 मोठ्या घोषणा

उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला राहुल गांधी गैरहजर असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी टीका केली. विरोधी पक्ष पूर्णपणे भरकटलेला आहे. गेल्या १० वर्षापासून लोकसभेत विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसला मिळू शकलेले नव्हते. पण यावेळी या पदावर काम करण्याची संधी मिळालेली असताना राहुल गांधी कायम दांडी मारत आहेत.

Anurag Thakur, Rahul Gandhi
Ind Vs Pak Asia Cup: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन भारतात पेटलं राजकारण! सरकारनं थेट नियमच सांगितला

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत अनुराग ठाकूर म्हणाले, "आंतरराष्ट्रीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) किंवा आशियायी क्रिकेट परिषद (एसीसी) घेत असते. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक देशाने सहभाग घेणे आवश्यक असते. भाग घेतला नाही तर त्या देशाच्या संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागते आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचा विनाकारण फायदा होतो. द्वीपक्षीय मालिकेत पाकिस्तानसोबत खेळायचे नाही, ही भूमिका भारताने घेतलेली आहे. जोवर पाकिस्तानकडून भारतावर होणारे दहशतवादी हल्ले थांबत नाहीत, तोवर पाकिस्तानशी द्वीपक्षीय मालिका होणार नाही"

Anurag Thakur, Rahul Gandhi
UK Indian Women Raped: युकेमध्ये घडला भयानक प्रसंग! एका २० वर्षीय भारतीय महिलेवर दिवसाढवळ्या दोघांचा अत्याचार; देश सोडण्याची दिली धमकी

आईचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वोच्च असते. पण काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल इतके खालच्या स्तराला गेले आहेत, की पंतप्रधानांच्या स्वर्गवासी मातोश्रींविषयी त्यांनी अपशब्द वापरले, शिव्या दिल्या. 'एआय' दुरुपयोग करून व्हिडिओ तयार केला. यावरून काँग्रेसची मानसिकता स्पष्ट होते. राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज आहे का? बिहारची आणि देशाची जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही, असंही ठाकूर यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com