Ahmednagar Bribe News : लाच घेण्याचा 'डिजिटल पॅटर्न' ; थेट फोन पे वरून घेतला 'हफ्ता' !

Bribe Taken From Digital Payment : तडजोड करून 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
Nagar Bribe News :
Nagar Bribe News : Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शासकीय यंत्रणेला लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे एखाद्या कामासाठी लाच मागणे आणि ती स्वीकारणे. लाच घेताना कोणताही पुरावा मिळू नये यासाठी लोकसेवकांकडून नाना युक्त्या अवलंबल्या जातात. मात्र, नगरमध्ये एका लाचखोर बहाद्दराने लाच हातात न घेता चक्कं डिजिटल स्वरुपात घेतले आहे. त्याने थेट 'फोन पे' वर लाच घेतली. (Latest Marathi News)

Nagar Bribe News :
Railway Officer Bribe News : पाच हजारांची लाच पडली महागात; रेल्वेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

या घटनेची अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने 2016 मध्ये भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (मर्या.केडगाव, अहमदनगर) येथून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, तक्रारदार पतसंस्थेला मुदतीत कर्ज फेड करू शकले नाही, त्यामुळे सदर वसुलीसाठी पतसंस्थेने सहायक निंबधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनकडे पत्रव्यवहार केला. या प्रकरणात सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या वसुली अधिकारी यासिन नासर अरब याने कर्ज फेड करण्यासाठी 2 महिन्याची मुदत तक्रादाराला दिली. त्या बदल्यात त्याने एक हजार रुपये 'फोन पे'वर स्वीकारले. या रकमेची कोणतीही पावती दिली गेली नाही.

दरम्यान, तक्रारदाराने आपली थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम पतसंस्थेला भरली. मात्र आरोपी लोकसेवक अरब याने तक्रारदार यांना वारंवार फोन करून मी तुला कर्ज फेड करण्यास मुदत दिली, तुझ्या जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही, लिलाव होऊ दिला नाही, असे सांगून मदत केल्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यात तडजोड करून 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

Nagar Bribe News :
Maan Bribe News : नऊ हजारांची लाच स्वीकारताना माण तालुक्यातील तलाठ्यास पकडले

या बाबत तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली. यानंतर यासाठी सापळा लावण्यात आला. लाचेचा पहिला 7 हजार रुपयांचा हप्ता आरोपी लोकसेवक अरब याने रोख न स्वीकारता, फोन पे वर पाठवण्यास सांगितला. ही रक्कम आरोपीच्या खात्यात जमा होताच, एसीबीच्या पथकाने आरोपी यासिन नासर अरब याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagar Bribe News :
NCP Crisis News : अजित पवारांची बैठकीला दांडी; शरद पवार यांच्यापुढे येणे जाणीवपूर्वक टाळले ?

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी विभागाचे अधिकारी शरद गोर्डे, राजू आल्हाट, रमेश चौधरी, रविंद्र निमसे, सचिन सुद्रुक यांच्या पथकाने ही कारवाई विभागाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com