Maan Bribe News : नऊ हजारांची लाच स्वीकारताना माण तालुक्यातील तलाठ्यास पकडले

Court Order न्यायालयाच्या या आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी शेनवडीचे तलाठी यांनी तक्रारदार यांच्याकडे अकरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
Maan Bribe News
Maan Bribe Newssarkarnama

Maan Bribe News : न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नावांची नोंद करण्यासाठी अकरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन नऊ हजार रुपये प्रत्यक्ष स्वीकारताना शेनवडीच्या (ता. माण) तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Curruption Department दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चुलत सासऱ्याची शेनवडी (ता. माण) Maan येथील साडेतेरा एकर जमीन म्हसवड न्यायालय यांच्याकडील हुकूमनाम्याचा आदेश होऊन साडे तेरा एकर जमीन तक्रारदार यांच्या पती व दिराच्या नावावर करण्याचे आदेश न्यायालयाने दिला होता.

न्यायालयाच्या या आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी शेनवडीचे तलाठी तुकाराम शामराव नरळे यांनी तक्रारदार यांच्याकडे अकरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती नऊ हजार रुपये देण्याचे कबूल केले.

त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. यामध्ये नऊ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी नरळे यांना रंगेहात पकडण्यात आले. हा सापळ पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निलेश चव्हाण, प्रशांत नलावडे , तुषार भोसले, मारुती अडागळे यांनी यशस्वी केला.

Edited By Umes Bambare

Maan Bribe News
Maan Khatav News: माण-खटावमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस आक्रमक...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com