Dilip Mane : दिलीप मानेंनी टायमिंग साधलं; बाजार समिती निवडणूक रंगत असतानाच ‘दोस्ती अस्त्र’ काढले बाहेर, पालकमंत्र्यांशी बंद खोलीत चर्चा, दुपारी भोजन

Solapur Bazar Samiti Election 2025 : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांची माजी आमदार दिलीप माने यांच्याशी दोस्ती होती. दोघेही एकाच वेळी एकाच पक्षात असल्याने गोरे आणि माने यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती. गोरे यांनी पक्ष बदलल्यानंतरही दिलीप माने यांच्याशी त्यांचा दोस्ताना कायम आहे.
Dilip Mane-Jaykumar Gore
Dilip Mane-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 April : सोलापूर बाजार समितीची निवडणूक रंगतदार वळणावर आलेली असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात पालकमंत्री गोरे हे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी आज (ता. ०३ एप्रिल) दुपारी स्नेहभोजनाला जाणार आहेत. एकीकडे माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित येण्याची चर्चा सुरू असताना मानेंनी ‘दोस्ती’अस्त्र बाहेर काढले आहे. तत्पूर्वी आज सकाळी शासकीय विश्रामगृहात या दोन मित्रांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली आहे. या दोन मित्रांच्या भेटीनंतर बाजार समितीची समीकरणे कशी असणार, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे बुधवारपासून (ता. ०२ एप्रिल) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गोरे हे बुधवारी अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते. अक्कलकोटमध्ये स्वीमा समर्थांचे दर्शन घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांनी सोलापूर शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला. गुरुवारी सकाळपासून ते प्रशासकीय बैठका, पक्षाचे मेळावे आणि पक्षाच्या नेत्यांच्या गोठीभेटी घेत आहे.

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) हे आज सकाळीच पालकमंत्री गोरे यांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृहात दाखल झाले होते. पालकमंत्री गोरे आणि माजी आमदार माने यांच्यात शासकीय विश्रामृहात एक बंद खोलीत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. पण, बाजार समितीची निवडणूक, सोलापूर जिल्हा दूध संघावर नियुक्त करण्यात आलेला प्रशासक आणि प्रशासकीच्या नियुक्तीस स्थगिती, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेले आदेश यासंदर्भात चर्चा होऊ शकते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांची माजी आमदार दिलीप माने यांच्याशी दोस्ती होती. दोघेही एकाच वेळी एकाच पक्षात असल्याने गोरे आणि माने यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती. गोरे यांनी पक्ष बदलल्यानंतरही दिलीप माने यांच्याशी त्यांचा दोस्ताना कायम आहे. सिद्धनाथ साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला दिलीप माने यांनी वर्षे, दीड वर्षभरापूर्वी बोलावले होते, त्यामुळे बाजार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांनी बाहेर काढलेले ‘दोस्ती अस्त्र’ महत्वपूर्ण ठरणार आहे.

Dilip Mane-Jaykumar Gore
BJP vs Shivsena : मंदा म्हात्रेंच्या पराभवासाठी झटलेला नेता पुन्हा शिवसेनेत; एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात उत्तर सोलापूर तालुक्यातील चार विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या उच्च न्यायालयात गेल्या होत्या. गेल्या सहा वर्षांपासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बॅंकेवर प्रशासक आहेत. निवडणुकी घेण्याबाबत येत्या चार आठवड्यात निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने सहकार आयुक्तांना दिले आहेत. ह्या सोसायट्या माने यांच्या समर्थकांच्या आहेत, त्यामळे त्याबाबतही चर्चा होऊ शकते.

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे हे माजी आमदार दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील ‘सुमित्रा’ या निवासस्थानी जाणार आहेत. त्या ठिकाणी ते स्नेहभोजन घेणार आहेत. या वेळी या दोन मित्रांमध्ये बाजार समिती निवडणूक, जिल्हा सहकारी बॅंक याबाबत चर्चा होऊ शकते. सर्वांत महत्वाचे म्हणजे सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र येत असताना हे ‘दोस्ती अस्त्र’ कितपत कामी येते, हे पाहावे लागणार आहेत.

Dilip Mane-Jaykumar Gore
Karad : सह्याद्री काबीज करायला निघालेल्या भाजप जिल्हाध्यक्षांना मोठा धक्का; प्रमुख शिलेदाराच रणांगणातून बाहेर!

माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून ४१ अर्ज अपात्र ठरले आहेत. निवडणुकीत ३८८ अर्ज शिल्लक राहिले आहेत. माघारीची मुदत १६ एप्रिलपर्यंत असणार आहे. तोपर्यंत कोण कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. माघारीनंतर बाजार समितीच्या निवडणुकीचे खरं चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com